जाहीर सभेत अमोल कोल्हेंनी सांगितलं शिवसेना सोडल्याचं खरं कारण...

जाहीर सभेत अमोल कोल्हेंनी सांगितलं शिवसेना सोडल्याचं खरं कारण...

स्वतः डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेना का सोडली याचं उत्तर जाहीर सभेत दिलं.

  • Share this:

रायचंद शिंदे, प्रतिनिधी

शिरूर, 27 एप्रिल : गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिवसेना का सोडली या प्रश्नाची चर्चा शिरूर लोकसभा मतदार संघात सुरू असताना अखेर आज सांगता सभेत स्वतः डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेना का सोडली याचं उत्तर जाहीर सभेत दिलं.

'मी शिवसेनेत असताना मला सातारा लोकसभा मतदारसंघातून छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवावी असा आग्रह धरला जात होता. मात्र, छत्रपतींच्या गादीची कधीच गद्दारी करणार नाही ही भावना मनात धरून मी बाहेर पडलो.' असा गौप्यस्फोट प्रचार सभेच्या सांगता सभेत डॉ. अमोल कोल्हे यांनी केला.

तर दुसरीकडे मावळ गोळीबार प्रकरणांमध्ये अजित पवार यांचा हात असल्याचा आरोप गेल्या अनेक दिवसापासून सुरू असताना या देशात राज्यात सरकार तुमचं आहे. कितीही आणि कशीही चौकशी करा चौकशीत जर दोषी आढळलो तर देशातल्या कुठल्याही चौकात मला फाशी द्या. मात्र, हे आरोप खोटे निघाले तर आरोप करणा-यांना फाशी द्यावी लागेल' असं धक्कादायक वक्तव्य अजित पवारांनी केलं.

हेही वाचा : 'राज ठाकरेंवर टीका केली तर त्याला मारणारच, अनुभवायचं असेल तर बोलून बघा'

शिरूर लोकसभा मतदारसंघावर गेल्या पंधरा वर्षांपासून शिवसेनेचे खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी जनमानसात एक वेगळे स्थान निर्माण केलं होतं. हेच स्थान राष्ट्रवादी काँग्रेसला स्वतःच्या मोठी हवा असल्याने त्यांनी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांना आढळरावांच्या विरोधात मैदानात उभं केलं आणि ही शिरूर लोकसभेची लढाई सुरू झाली. भाजप-सेनेकडून शिरूर लोकसभा मतदारसंघात 13 मंत्र्यांच्या सभा झाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्येक नेत्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला.

या प्रचार दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून विमानतळ, बैलगाडा शर्यत बंदी, पुणे-नाशिक रेल्वे मार्ग, महामार्गांवरील वाहतूक कोंडी या प्रमुख मुद्द्यांना लक्ष्य करण्यात आलं. तर विरोधकांनी केलेल्या आरोप हे त्यांचं पाप असल्याचं आढळरावांनी प्रत्येक सभेत ठामपणे सांगितलं.

शिरूर लोकसभा मतदारसंघात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी मतदार राजाने अनुभवल्या. पण हा मतदार राजा हुशार झाला आहे. येणाऱ्या 29 तारखेला हा मतदार राजा योग्य पर्याय निवडून एक चांगला आणि सक्षम उमेदवार निवडतील एवढीच अपेक्षा करूया.

SPECIAL REPORT : लाव रे तो व्हिडिओ Vs बघाच हा व्हिडिओ...

First published: April 27, 2019, 9:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading