मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

'लोकप्रियतेमुळे नव्हे तर राष्ट्रवादीच्या निष्ठावंतांमुळे अमोल कोल्हे खासदार'; खेडच्या आमदारांचा NCP ला घरचा आहेर

'लोकप्रियतेमुळे नव्हे तर राष्ट्रवादीच्या निष्ठावंतांमुळे अमोल कोल्हे खासदार'; खेडच्या आमदारांचा NCP ला घरचा आहेर

राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसच्याच पुणे (Pune News) जिल्ह्यातील खेडच्या आमदाराने आपल्याच पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना खोचक चिमटा काढला.

राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसच्याच पुणे (Pune News) जिल्ह्यातील खेडच्या आमदाराने आपल्याच पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना खोचक चिमटा काढला.

राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसच्याच पुणे (Pune News) जिल्ह्यातील खेडच्या आमदाराने आपल्याच पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना खोचक चिमटा काढला.

पुणे, 5 डिसेंबर : "स्वतःच्या लोकप्रियतेमुळे नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावान, प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या कष्टाने तुम्ही खासदार झाला याचे भान असुद्या" असं म्हणत राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसच्याच पुणे (Pune News) जिल्ह्यातील खेडच्या आमदाराने आपल्याच पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना खोचक चिमटा काढला. खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आगामी जिल्हा बँक, दुध संघ, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वाकी, संतोषनगर येथील साई कृपा मंगल कार्यालयात आयोजित केला होता. यावेळी आमदार मोहितेपाटील बोलत होते. मागील 2 वर्षांत खासदार अमोल कोल्हे हे मतदार संघात दिसत नाहीत, कामे करत नाहीत म्हणून विरोधकांनी अनेकदा रान उठवलं होतं. मात्र आता मोहितेंनी ही खदखद बोलून दाखवल्यानं विरोधकांसह पक्षातील अनेकांनी भुवया उंचावल्या. अमोल कोल्हे खेड तालुक्यातील  कोणताही निर्णय घेताना आपल्याला विचारात घेत नाही. तालुक्यात परस्पर निर्णय येऊन कार्यक्रम करतात आणि ज्यांनी निवडणुकीत जीवाचं रान करून निवडून आणले त्या गावपातळीवरील कार्यकर्त्यांच्या आणि आमच्या विरोधकांना बरोबर घेतात, हे बरं नाही असं सांगत मोहिते पुढे म्हणाले की, समाजकारण यु ट्यूब, फेसबुकवर पोस्ट टाकण्याऐवढे सोपे नाही असा चिमटा काढत ज्यासाठी तुम्हाला योग्य समजून मते दिली त्या लोकांचे काम करा आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत या, असंही ते यावेळी म्हणाले. यावेळी जिल्हा बँकेचे मतदार प्रतिनिधी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, सुरेखाताई मोहिते, अरुण चांभारे, अनिलबाबा राक्षे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, अशोक राक्षे, बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, पंचायत समितीचे सभापती अरुण चौधरी, उपसभापती वैशाली गव्हाणे, पीएमआरडीए मंडळ संचालक वसंत भसे,खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम लोखंडे, राजगुरूनगर बँकेचे उपाध्यक्ष अरुण थिगळे, नवनाथ होले, सुभाष होले आदी उपस्थित होते. हे ही वाचा-'तुम्हाला लाज वाटली पाहिजे',सावरकरांच्या मुद्द्यावरून फडणवीसांची सेनेवर टीका शिरुर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हेंना लक्ष केल्यानंतर पुणे जिल्हा दुध संघालाही आमदार दिलीप मोहिते पाटलांनी लक्ष केलं. जिल्हा दुध संघाचा सध्याचा अध्यक्ष मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत आहे. संघातील डांबरट संचालक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने सत्ता उपभोगत आहेत. मात्र पक्षाच्या विरोधात भूमिका घेऊन दुधउत्पादकांची लूट करीत आहेत. त्यांच्या विरोधात तक्रार केली, त्यात तथ्य आहे. मात्र महाआघाडीचे तीन पक्षाचे सरकार असल्याने कारवाई होऊ शकत नसल्याची खंत व्यक्त केली. दिलीप मोहिते यांच्या या पक्षविरोधी आणि पक्षातील स्टार प्रचारक असलेल्या खासदाराबद्दल केलेल्या वादग्रस्त बोलण्यामुळे खेड तालुक्यातील राजकारणात पुन्हा एकदा अंतर्गत राजकिय कलह सुरू झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
First published:

Tags: Pune

पुढील बातम्या