भाजपचे 'हे' दोन नेते घेतील युतीचा निर्णय - चंद्रकांत पाटील

भाजप आणि शिवसेनेमध्ये येणाऱ्यांची मोठी रांग आहे. उदयनराजेंच्या सगळ्या मागण्या पूर्ण करू ते राजे आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 30, 2019 07:31 PM IST

भाजपचे 'हे' दोन नेते घेतील युतीचा निर्णय - चंद्रकांत पाटील

वैभव सोनवणे, 30 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकींची आचार संहिता लागायला आता काही दिवसांचा वेळ राहिलाय. मात्र अजुनही 'युती'बाबत शंका घेतली जातेय. वातावरण अनुकूल असल्याने भाजप स्वबळावर निवडणूक जिंकू शकतो असं भाजपने केलेल्या सर्व्हे स्पष्ट झालंय. त्यामुळे भाजप स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याचंही म्हटलं जातंय. शिवसेनेसोबत युतीचा निर्णय हा अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेतील असं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलंय. चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजप आणि शिवसेनेमध्ये येणाऱ्यांची मोठी रांग आहे. जयकुमार गोरेंनी राजीनामा दिला आहे. नारायण राणे हा माझ्या हाताबाहेरचा विषय आहे असंही त्यांनी सांगितलं. उदयनराजेंच्या सगळ्या मागण्या पूर्ण करू ते राजे आहेत असं सांगत त्यांनी राजेंच्या भाजप प्रवेशाचे संकेत दिलेत.

माझी राजकीय आकांक्षा काहीच नाही, पक्ष सांगेल ते काम करू असंही ते म्हणाले. मंदीचा परिणाम हा सगळ्या जगात आहे. सुशिक्षीत नागरिकांना हे समजत, सरकारची त्यात काही चूक नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

निवडणूक आयोगाच्या आधीच अर्थमंत्र्यांनी सांगितली विधानसभेच्या निवडणुकीची तारीख

नारायण राणे वेटिंग लिस्टवरच

निवडणुकीच्या तोंडावर नेते पक्ष सोडून जात असल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला जोरदार हादरे बसत आहेत. नेत्यांचं पक्ष बदलण्याचं प्रमाण एवढं वाढलं की आता त्याला मेगाभरती असं नावही पडलं. या मेगाभरतीचा आणखी एक टप्पा पुढच्या आठवड्यात होणार असून त्याचा मुहूर्तही ठरला आहे. 1 सप्टेंबरला सोलापूरात भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत राणा जगजितसिंह, जयकुमार गोरे आणि धनंजय महाडिक हे दिग्गज नेते भाजपवासी होणार आहेत. मात्र ज्येष्ठ नेते नारायण राणे हे अद्याप वेटिंग लिस्टवरच असून ते केव्हा प्रवेश घेतील हे निश्चित झालेलं नाही.

Loading...

भास्कर जाधवांचं भाजपबाबत ठरलं! कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीर केला हा निर्णय

राणे आपला महाराष्ट्र स्वाभीमान हा पक्ष भाजपमध्ये विलीन करणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री सांगतील तेव्हा भाजपप्रवेश होईल असंही राणे यांनी सांगितलं होतं. पण माशी कुठं शिंकली हे गुलदस्त्यातच आहे. या आधीही राणे यांना भाजपने बराच काळ वेटिंगवरच ठेवलं होतं. नंतर ते भाजपच्या मदतीने खासदार झाले. मात्र ते दिल्लीत फार कधी रमलेच नाहीत.

निवडणूक आयोगाच्या आधीच अर्थमंत्र्यांनी सांगितली विधानसभेच्या निवडणुकीची तारीख

उदयनराजे मोदींच्या उपस्थितीत करणार प्रवेश

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत सोलापूरमध्ये उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करतील, असं बोललं जात होतं. मात्र उदयनराजे अमित शहा यांच्या नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत थेट दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती आता सूत्रांकडून मिळाली आहे. जोरदार शक्तीप्रदर्शनासह उदयनराजेंना पक्षात घेण्याचा भाजपचा विचार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2019 07:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...