Home /News /pune /

अ‍ॅम्ब्युलन्सच्या सायरनचा आवाज लवकरच बदलणार, Ambulance च्या Siren वर वाजणार आकाशवाणीची धून

अ‍ॅम्ब्युलन्सच्या सायरनचा आवाज लवकरच बदलणार, Ambulance च्या Siren वर वाजणार आकाशवाणीची धून

Nitin Gadkari on Ambulance Siren: कर्णकर्कश आवाजामुळे होणारे प्रदुषण आणि त्रास टाळण्यासाठी नितीन गडकरी यांनी आता एक मोठी घोषणा केली आहे.

    पुणे, 24 सप्टेंबर : ध्वनी आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी भारतातील सर्व गाड्यांचे कर्णकर्कश हॉर्न बदलून वाद्यांचे मधूर आवाज असलेले हॉर्न लवकरच लावण्यात येणार आहेत. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी काही दिवसांपूर्वीच याबाबतची माहिती दिली होती त्यानंतर आता अ‍ॅम्ब्युलन्सच्या सायरनचा आवाज (Ambulance siren sound) बदलण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. लवकरच या संदर्भात आदेश काढण्यात येणार असल्याचं गडकरींनी पुण्यातील (Pune) कार्यक्रमात म्हटलं आहे. अ‍ॅम्ब्युलन्सच्या सायरनवर आकाशवाणीची धून नितीन गडकरी म्हणाले, "मी सर्व मंत्र्यांचे हॉर्न बदलले, लाल दिवे काढून टाकले. आता पोलीस आणि अ‍ॅम्ब्युलन्सचे आहेत. मी नागपुरात 18व्या मजल्यावर फ्लॅटमध्ये राहतो. रोज एकतास प्राणायम करतो, तेव्हा मला पहिल्यांदा लक्षात की साऊंडमुळे किती त्रास होतो. मेडिकल सायन्सप्रमाणे याचा एक दुष्परिणाम आहे आपल्यावर. डॉक्टरची बिलं आपण भरतो याचं कारण वायू प्रदूषण, पाणी प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण आहे. मी आता एक ऑर्डर काढणार आहे की, जर्मन संगीतकार होता त्याने आपल्याकडे आकाशवाणीची एक ट्यून तयार केली होती. सकाळी साडेपाच वाजता ती ट्यून वाचायची. मी ती ट्यून शोधून काढली आहे आणि मी म्हटलं अ‍ॅम्ब्युलन्सवर ही ट्यून लावा. ती कानाचा लांगले वाटते." मी रस्त्याने येत असताना बरं वाटलं, सर्व रस्ते बंद केले होते. मी चंद्रकांतदादांना म्हटलं आपल्याला बरं वाटलं ना? की ट्रॅफिक नाही. पण आज प्रत्येक माणूस तुम्हाला आणि मला शिव्या देत असतील की यांनी रस्ता बंद केला. त्यामुळे दरवेळेला रस्ते बंद नका करू. ते झेड प्लसमध्ये असल्याने त्यांचे प्रोटोकॉल आहेत असंही नितीन गडकरी म्हणाले. ‘पाँ-पाँ’ ऐवजी ऐकू येणार ‘सारेगम’ गाड्यांच्या हॉर्न संदर्भात काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी कर्णकर्कश आवाजाऐवजी मधूर आवाज असलेले हॉर्न वापरण्यात येणार असल्याचं म्हटलं होतं. भविष्यात रस्त्यावरून चालत असताना हॉर्नच्या कर्णकर्कश आवाजांऐवजी पेटी, तबला, तानपुरा किंवा बासरीचा आवाज कानी पडले, तर आश्चर्य वाटून घेऊ नका. वाहनांमध्ये मोठ्या आवाजाच्या हॉर्नऐवजी आता भारतीय वाद्यांचा वापर करण्याच्या दिशेनं पावलं पडत असल्याची माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली होती. प्रदूषण होणार कमी वायूप्रदुषणासोबत सध्या ध्वनीप्रदुषणदेखील वाढत आहे. अनेक वाहनचालक त्यांच्या गाडीला मोठ्या आवाजाचे हॉर्न बसवून घेतात. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अनेकजण गरज नसताना कर्कश हॉर्न वाजवताना दिसतात. तर अनेकदा या मोठ्या हॉर्नमुळे वाहनचालकांचं वाहनावरचं नियंत्रण सुटून अपघात होण्याच्या घटनादेखील घडत असतत. हे टाळण्यासाठी आता कर्कश ह़ॉर्नच्या जागी भारतीय वाद्यांचा वापर करता येईल का, याचा विचार करण्याचे आदेश वाहतूक मंत्रालयाला देणार असल्याचं नितीन गडकरी यांनी सांगितलं होतं.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Nitin gadkari, Pune

    पुढील बातम्या