पुणे जिल्ह्यात वॉकी-टॉकीच्या साहाय्याने दारू विक्री, पती-पत्नीसह दीर अशा तिघांवर गुन्हा दाखल

पुणे जिल्ह्यात वॉकी-टॉकीच्या साहाय्याने दारू विक्री, पती-पत्नीसह दीर अशा तिघांवर गुन्हा दाखल

स्थानिक गुन्हे शाखा पथक व मंचर पोलिसांनी हॉटेल मनोरंजन येथे छापा टाकला.

  • Share this:

पुणे, 10 ऑक्टोबर : अत्याधुनिक संसाधनांचा कशासाठी वापर होईल, हे सांगता येत नाही. पुणे जिल्ह्यातही असाच एक प्रकार समोर आला आहे. वॉकी-टॉकीच्या साहाय्याने दारू विक्री करणाऱ्या पती पत्नीसह दीर अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा व मंचर पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. आरोपींकडून 1.73 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी निलेश बबन काळे, संतोष काळे व नीता काळे यांच्याविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मौजे भावडी येथील हॉटेल मनोरंजनमध्ये निलेश काळे व संतोष काळे हे दोन सख्खे भाऊ वॉकी-टॉकीचा वापर करून बेकायदेशीर दारू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा पथक व मंचर पोलिसांनी हॉटेल मनोरंजन येथे छापा टाकला.

पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी निलेश काळे हा मागील दरवाजातून पळून गेला. हॉटेलची झडती घेतली असता, काउंटरजवळ देशी-विदेशी दारू आढळून आली. पोलिसांनी कुलप तोडून आत प्रवेश केल्यानंतर एका खोलीतील बाथरूममध्ये देशी विदेशी दारूचा साठा आढळला. या ठिकाणाहून 1 लाख 69 हजार 910 रुपयांची देशी-विदेशी दारू व चार हजार रुपयांच्या दोन वॉकी टॉकी असा एकूण 1 लाख 73 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दरम्यान, पोलिसांच्या या धडक कारवाईनंतर आंबेगावसह पुणे जिल्ह्यात बेकायदेशीररित्या दारुविक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Published by: Akshay Shitole
First published: October 10, 2020, 5:19 PM IST

ताज्या बातम्या