अंतराळ संशोधनातील मोठी घटना, पुण्यातील NCRA च्या शास्त्रज्ञांनी लावला मृत आकाशगंगेचा शोध

अंतराळ संशोधनातील मोठी घटना, पुण्यातील NCRA च्या शास्त्रज्ञांनी लावला मृत आकाशगंगेचा शोध

या आकाशगंगेचे वैशिष्ठ म्हणजे, तिचा विस्तार 3 लाख प्रकाशवर्षं आहे, 7.6 कोटी वर्ष तीच वय आहे.

  • Share this:

पुणे, 29 जून : पुणे जिल्ह्यातील जुन्नरच्या खोडद येथील जगातल्या सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बीण प्रकल्पाच्या अर्थात जीएमआरटीच्या मदतीने पुणे येथील एनसीआरएच्या शास्त्रज्ञानी दुर्मिळ अशा मृत आकाशगंगेचा शोध  लावला आहे. 'जे 16155452' असं या आकाशगंगेच नाव आहे.

या आकाशगंगेच्या अवशेषांतून रेडिओ लहरींचे उत्सर्जन होत आहे. या संदर्भातले संशोधन राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकशास्त्र  केंद्राच्या(एनसीआरए) डॉ.सी.एच ईश्वरचंद्रा आणि आफ्रिकेतील डॉ.झारा आर यांनी केले आहे. ते नुकतेच प्रकाशित झालेल्या 'आर्काईव्ह' या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे.

संपूर्ण आकाशगंगाच कृष्णविवराने गिळंकृत केल्यावर त्यातील इलेक्ट्रॉनच्या वारंवारितेमुळे रेडिओ तरंग उत्सर्जित होतात. अशा आकाशगंगेचे अवशेष सापडणे तसे दुर्मिळ असते. पण, त्याचबरोबर तिचा अभ्यास करण्याचे आव्हानही असते. या शास्त्रज्ञानी पुणे जिल्ह्यातील खोडद येथील जायंट मिटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप(जीएमआरटी) आणि साऊथ आफ्रिकन ऍस्ट्रॉनॉमिकल ऑब्झवेटरीच्या सहाय्याने तिचा शोध घेतला आहे.

आकाशगंगेतील जटिल गाभा, प्रकाश आणि पदार्थाचे वेगाने होणारे उत्सर्जन(जेट) आणि उष्ण ठिकाणे आढळली नाहीत. काही लाख वर्षांपूर्वीच तिच्यातील इंधन संपुष्टात आले. 2017-18 मध्ये शास्त्रज्ञांनी या आकाशगंगेचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.

या आकाशगंगेचे वैशिष्ठ म्हणजे, तिचा विस्तार 3 लाख प्रकाशवर्षं आहे, 7.6 कोटी वर्ष तीच वय आहे, 150 ते 1400 मेगाहर्टझ लहरींचे तिच्यातून उत्सर्जन होत आहे आणि सुमारे 30 टक्के भाग अजून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

मस्जिदमध्येच उभारलं ऑक्सिजन सेंटर, सर्व जाती धर्मातील रुग्णांना मिळतो उपचार

या संशोधनामुळे आकाशगंगा, कृष्णविवरांच्या उत्क्रांतीचा काळ समजण्यास मदत होण्यास मदत होईल आणि खगोलशास्त्रातील संशोधनाला चालना मिळेल. यासोबत देशातील विद्यार्थ्यांना संशोधनासाठी अधिक माहिती उपलब्ध होईल.

"उपलब्ध खगोलीय माहितीच्या आधारे शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे तसेच अद्ययावत जीएमआरटीमुळे अशा अनेक आकाशगंगाचा शोध घेता येईल आणि यामुळे रेडिओ अवकाश शोधांचा खजिनाच शास्त्रज्ञ जगाच्या पुढे घेऊन येतील" असं एनसीआरएचे संचालक डॉ यशवंत गुप्ता यांनी सांगितलं.

'खोडद येथील जीएमआरटी रेडिओ दुर्बीण खूप संवेदनशील असल्याने मिळणारी माहिती अचूक व महत्त्वाची असते. महणूनच अशा प्रकारचे शोध लागले आहेत. यापुढील काळातही भारतीय जीएमआरटी रेडिओ दुर्बीण अनेक शोध लावण्यात यशस्वी होईल', अशी माहिती जीएमआरटीचे वरिष्ठ प्रशासन अधिकारी डॉ.जे के सोळंकी यांनी दिली.

संपादन - सचिन साळवे

First published: June 29, 2020, 8:47 AM IST
Tags:

ताज्या बातम्या