Home /News /pune /

VIDEO: 'मी काय कुंद्रा आहे का?' राज ठाकरेंची पुण्यात मिश्किल टिप्पणी, पाहा नेमकं काय घडलं

VIDEO: 'मी काय कुंद्रा आहे का?' राज ठाकरेंची पुण्यात मिश्किल टिप्पणी, पाहा नेमकं काय घडलं

Raj Thackeray on Pune Tour: मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरेंचा हा तीन दिवसीय दौरा आहे.

पुणे, 28 जुलै : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) हे तीन दिवसीय पुणे दौऱ्यावर (Pune) आहेत. पुणे दौऱ्यात राज ठाकरे आपल्या पक्षातील पदाधिकारी, शाखा अध्यक्षांसोबत संवाद साधणार आहेत. पुणे दौऱ्यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत आज एक मिश्किल टिप्पणी केली आणि मग एकच हशा पिकल्याचं पहायला मिळालं. झालं असं की, राज ठाकरे पुण्यातील कार्यालयात दाखल झाल्यावर सर्व पत्रकार, कॅमेरामन, फोटोग्राफर्सने त्यांचे फोटोज, व्हिडीओ कटवेज घेण्यासाठी गर्दी केली. बराचवेळ फोटोग्राफर फोटोज क्लिक करत होते हे पाहून राज ठाकरेंनी मिश्किल टिप्पणी केली. फोटोग्राफर्सकडे पाहून राज ठाकरेंनी हसत म्हटलं, सर्व कालं का कान नाक? किती वेळा तेच तेच. मी काय कुंद्रा आहे का? पाहा नेमकं काय म्हणाले राज ठाकरे? मनसेप्रमुख राज ठाकरे आजपासून तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. या काळात ते मनसेच्या 152 शाखाध्यक्षांशी वन टू वन बोलणार आहेत. तसेच मनसेमधील गटअध्यक्ष या राजदूत म्हणून जबाबगारी सोपवली जाणार आहे. हे राजदूत यापुढे कायम मतदारांशी संपर्क ठेवून मनसेची ध्येय धोरणं पटवून देतील. आजपासून तीन दिवस राज ठाकरेंचा पुण्यात मुक्काम असा आहे राज ठाकरेंचा पुणे दौरा 28 जुलै - सकाळी 9 वाजता - कसबा मतदारसंघ सकाळी 10 वाजता - पर्वती मतदारसंघ सकाळी 11 वाजता - हडपसर मतदारसंघ 29 जुलै सकाळी 9 वाजता - शिवाजी नगर मतदारसंघ सकाळी 10 वाजता - कोथरूड मतदारसंघ सकाळी 11 वाजता - कॅटोमेंट मतदारसंघ 30 जुलै सकाळी 9 वाजता - खडकवासला मतदारसंघ सकाळी 10 वाजता - वडगावशेरी मतदारसंघ कोण आहे राज कुंद्रा? बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात दररोज नवनव्या तरुणी, मॉडेल आणि अभिनेत्रींकडून धक्कादायक माहिती, तसेच इतर पुरावे समोर येताना दिसत आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
First published:

Tags: Pune, Raj Thackeray

पुढील बातम्या