पुणे, 21 जुलै : आज चाकण एमआयडीसी (Chakan MIDC) परिसरातील एटीएममध्ये स्फोट (Explosion in ATM) झाल्याची माहिती समोर आली. याच दरम्यान आता एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये चोरांनी एटीएममधील बॉक्स घेऊन पळ काढला. धक्कादायक म्हणजे यावेळी चोरट्याने सीसीटीव्हीकडे पाहून सॅल्यूट केला आहे.
याचा एक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं असून यामध्ये दोन्ही चोर दुचाकीवर असल्याचं दिसत आहे. त्यापैकी एक चोर दुचाकीवर बसलेला आहे. आणि दुसरा चोर एटीएममधून पैशांना बॉक्स घेऊन येतो आणि ते घेऊन तो गाडीच्या मागच्या बाजूला बसतो. यादरम्यान गाडी चालविणाऱ्या चोराने सीसीटीव्हीच्या दिशेने हातवारे केले. त्याने चक्क सीसीटीव्हीकडे बघून सॅल्यूट केल्याचं सांगितलं जात आहे. चोरांनी वाढणारी हिंमत पाहून परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येईल.
कोरोना काळात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
हे ही वाचा-खळबळजनक! दोन दिवसांत 2 ATM सेंटरमध्ये स्फोट; CCTV आला समोर
चाकण एमआयडीसी (Chakan MIDC) परिसरातील एटीएममध्ये स्फोट (Explosion in ATM) घडवून आणल्यानंतर चोरांचं धक्कादायक कृत्य सीसीटीव्ही कैद झालं आहे. pic.twitter.com/VSbv9hjGE1
— News18Lokmat (@News18lokmat) July 21, 2021
मिळालेल्या हितीनुसार, पुण्यामधील चाकण एमआयडीसी परिसरामधील भांबोली गावात हिताची कंपनीचे एटीएम आहे. मध्यरात्री 1 च्या सुमारास या एटीएममध्ये अचानक स्फोट झाला. त्यामुळे परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे. विशिष्ट प्रकारच्या स्फोटकांनी हा स्फोट घडवून आणल्याचा अंदाज पोलिसांनकडून वर्तवला जात आहे. तर या स्फोटामध्ये एटीएम ATM मशिनचा अर्धा भाग फुटला असून, सुमारे 6 ते 7 लाख रुपये रक्कम चोरट्यांनी लांपास केली आहे. यादरम्यान, स्फोटाचे नेमकं काय कारण शोधण्यासाठी डॉग पथक आणि बॉम्ब शोधक आणि नाशक पथकही घटनास्थळी दाखल झाले. तर पुढील तपास बॉम्ब शोधक आणि पोलीस प्रशासन करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: ATM, Crime news, Pune