तारीख पे तारीख नको, अजित दादा 'हा' निर्णय घ्या; पुण्यातल्या व्यापाऱ्यांची मागणी

तारीख पे तारीख नको, अजित दादा 'हा' निर्णय घ्या; पुण्यातल्या व्यापाऱ्यांची मागणी

पुण्यात दुकाने उघाडायला महापौरांचा विरोध, पोलिसांचाही रेड सिग्नल असल्यानं गेली 4 दिवस केवळ बैठकांवर बैठका सुरू आहेत.

  • Share this:

पुणे 10 जून: पुणे शहरात कंटेन्मेंट झोन्स मध्येही दुकाने उघडायला परवानगी द्या अशी मागणी व्यापारी संघाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली. पवारांनी सध्या  कंटेन्मेंट झोन्सची जबाबदारी सोपवलेल्या साखर आयुक्त सौरभ राव यांच्यावर जवाबदारी सोपवून कार्यवाही करायला सांगितली मात्र महापौरांचा विरोध, पोलिसांचाही रेड सिग्नल असल्यानं गेले 4 दिवस केवळ बैठकांवर बैठका सुरू आहेत. 3 महिने होत आले व्यवसाय बंद असल्याने व्यापारी वैतागले आहेत.

पुणे शहरात सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात 100 मीटर अंतर सोडून दुकाने उघडण्यास परवानगी देऊ हे पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांचं अश्वानसन हवेत विरून 15 दिवस झालेत मात्र परवानगी काही मिळाली नाही.

धडाकेबाज पद्धतीने निर्णय घेणारे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनीही दुकाने लवकर सुरू करायचे आदेश दिलेत मात्र निर्णय होईना केवळ तारीख पे तारीख दिली जात असल्याने  व्यापाऱ्यांचा धीर सुटत चालला आहे. दुकानेच बंद असल्याने व्यपाऱ्यांनी आपलं पोट भरायचं कसं असा सवाल पुणे व्यापारी संघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी केला आहे.

कोरोना हॉटस्पॉटमध्ये मटण पार्टीवरून महापालिका आणि पोलिस आयुक्तांमध्ये जुंपली

कंटेन्मेंट झोन्समध्ये  कोरोना बाधित रुग्ण वाढत आहेत. सगळीकडे पत्रे बांबू ठोकलेले आहेत. शिवाय पोलिसही अनुकूल नाहीत महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही प्रतिकूल मत व्यक्त केलंय त्यामुळे निर्णय लवकर होत नाही.

मुंबईत सगळीकडे दुकाने सुरू करण्यात आली आहेत. पुण्यात प्रतिबंधितक्षेत्राबाहेर दुकाने सुरू असली तरी वेळ 9 ते 5 आहे.

भवानी पेठ, नाना पेठ या सध्या असलेल्या कंटेन्मेंट भागातच  बहुतांश व्यापारी दुकाने आहेत. आम्हाला 3 तास वेळ द्या पण द्या अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

"...तर कोरोना रुग्णांना रुग्णालयात उपचार घेण्याची गरज नाही"

प्रशासनातर्फे 14 जूनची तारीख देण्यात आली आहे. आतातरी निर्णय होणार का असा प्रश्न व्यापाऱ्यांनी विचारला आहे. त्यामुळे आता प्रशासनावरचा दबाव वाढला आहे.

 

First published: June 10, 2020, 3:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading