• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • Anant Chaturdashi ला पुण्यातील सर्व दुकाने बंद राहणार, केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार : अजित पवार

Anant Chaturdashi ला पुण्यातील सर्व दुकाने बंद राहणार, केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार : अजित पवार

Pune Shops will closed on Anant Chaturdashi: अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुण्यात कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • Share this:
 mपुणे, 17 सप्टेंबर : पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण, अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) म्हणजेच गणपती विसर्जनाच्या (Ganpati Visarjan) दिवशी पुण्यातील सर्व दुकाने बंद (Pune shops will closed) ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानेच सुरू ठेवण्यात येणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांनी ही माहिती दिली आहे. कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव आणखी वाढू नये यासाठी पुण्यातील निर्बंध विसर्जनाच्या दिवशी कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना परिस्थितीच्या संदर्भातील आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत अजित पवारांनी ही माहिती दिली. गणपती विसर्जनासाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दी झाल्याने कोविड संसर्ग पसरण्याची भीती वर्तवण्यात येत असल्याने अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुणे आणि आसपासच्या परिसरात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुण्यातील केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू राहणार आहेत. मृत्युदर कमी झाला, रुग्ण वाढ कमी झाली आहे. परिस्थिती अशीच राहिली तर 2 ऑक्टोबर ला नवा निर्णय घेऊ असंही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या मनता काय हे कसं सांगू? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावी सहकारी म्हणत केलेल्या वक्तव्याने विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. त्यासोबतच राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा येऊ लागल्या आहेत. मुख्यमंत्र्यांना नेमकं काय म्हणालयचं आहे आणि त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय असे प्रश्न विचारले जात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात पत्रकार परिषदेला संबोधित करताना अजित पवार म्हणाले, ते राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी काय बोलावं हे मी कसं ठरवणार? मुख्यमंत्र्यांच्या मनात काय हे मी कस सांगू? माझ्याशी बोलताना तर सरकारचे निर्णय, काय कसं चालवायचं, समस्या काय याच्याच चर्चा होतात. आज पूर्णपणे बहुमत महविकास आघाडीकडे आहे.
Published by:Sunil Desale
First published: