#SaveBalgandharva : बालगंधर्व रंगमंदिराचं आधुनिकीकरण नकोच!

#SaveBalgandharva : बालगंधर्व रंगमंदिराचं आधुनिकीकरण नकोच!

पुण्याचं बालगंधर्व रंगमंदिर वाचवण्यासाठी अनेक कलाकारांनी पुढाकार घेतला आहे. अनेकांनी त्याच्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आणि बालगंधर्वाचं आधुनिकीकरण नको अशी ठाम भूमिका मांडण्यात आली आहे.

  • Share this:

06 मार्च : पन्नास वर्ष जुन्या बालगंधर्व रंगमंदीराला बदलून टाकायची भूमिका पुण्यातल्या मनपाच्या राजकारण्यांनी घेतली आहे. आताच्या नाट्यगृहाच्या जागी अत्याधुनिक वास्तू उभी करणं, त्यासोबत आणखी एक छोटं नाट्यगृह आणि काही कलादालनं उभी करणे अशी स्थायी समिती अध्यक्षांची संकल्पना आहे. मात्र कलाकारांना हा प्रकार रुचत नाहीये. कलाकारांना भीती आहे ती वाढत्या सरकारी हस्तक्षेपाची आणि त्यातून होणाऱ्या नाट्यगृहांच्या अव्यवस्थेची.

पुण्याचं बालगंधर्व रंगमंदिर वाचवण्यासाठी अनेक कलाकारांनी पुढाकार घेतला आहे. अनेकांनी त्याच्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आणि बालगंधर्वाचं आधुनिकीकरण नको अशी ठाम भूमिका मांडण्यात आली आहे. पुर्नबांधणीच्या नावाखाली बालगंधर्व रंगमंदिर उध्वस्त होऊ नये अशी सर्व कलाकारांची अपेक्षा आहे.

पुणे शहर ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. इथं दिवंगत साहित्यिक पु.ल देशपांडे यांच्या कल्पनेतून बालगंधर्व रंगमंदिर साकारलं गेलं होतं. त्याचं नवं रुपडं बनवण्याची गरज आत्ता आहे का हा सवालही उरतोच. त्यामुळे बालगंधर्व रंगमंदिर वाचवण्यासाठी कलाकार आणि राजकारण्यांमध्ये चिघळलेला वाद नेमका कोणत्या मुद्द्यावर थांबतो हे पाहणं महत्त्वाचं आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 6, 2018 08:44 AM IST

ताज्या बातम्या