• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • जामनगरमधून ऑक्सीजनचा कोटा कमी, अजित पवारांची केंद्राला विनंती

जामनगरमधून ऑक्सीजनचा कोटा कमी, अजित पवारांची केंद्राला विनंती

'लसीकरणाची जबाबदारी राज्याने उचलावी, असं केंद्राला वाटतंय, त्यासाठी ग्लोबल टेंडर काढतोय'

  • Share this:
पुणे, 24 एप्रिल : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक जिल्ह्यात ऑक्सीजनचा तुटवडा जाणवत आहे. 'केंद्राच्या निर्देशानुसार, जामनगरधून मिळणारा कोटा कमी झाला आहे. तो आणखी वाढवून द्यावा', अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. तसंच, लसीकरणाची जबाबदारी राज्याने उचलावी, असं केंद्राला वाटतंय, त्यासाठी ग्लोबल टेंडर काढत असून समिती नेमणार आहे, अशी माहितीही अजित पवारांनी दिली. अजित पवार यांनी पुण्यात कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना राज्यातील कोरोना परिस्थितीबद्दल माहिती दिली. 'कोरोना आढावा बैठकीत ऑक्सीजन तुटवड्यावर चर्चा झाली. जामनगर प्लँटवरून ऑक्सीजन मिळण्यासाठी मी स्वत: अंबानी यांच्याशी बोललो आहे.  खाली टँकर एअरलिफ्ट होईल, भरलेला बाय रोड येईल', अशी माहिती अजित पवार यांनी दिली. सही पकडे है...राऊतांच्या 'ACP प्रद्युम्न' विरोधात चित्रा वाघांची 'भाभीजी' स्टाईल 'केंद्राच्या निर्देशानुसार जामनगरमधून मिळणारा कोटा कमी झाला, 250 मे. टनचा कोटा कमी करू नये, यासाठी केंद्रीय सरकारला विनंती करतोय. ज्या वेळेस केंद्र सरकार रेमडीसीवीर आणि ऑक्सीजन आयातीला मान्यता देतील तेव्हाच तुटवडा कमी होईल, 125 मे. टन मिळतोय आजपासून तो वाढून मिळावा', अशी मागणीही अजित पवारांनी केंद्राकडे केली आहे. 'ऑक्सीजन तुटवडा कमी करण्यासाठी बंद प्लँट चालू करणार आहोत. साखर कारखान्यांचा पर्याय तपासला जाईल, ऑक्सीजन निर्माण करण्यासाठी शरद पवारांच्या सुचनेनुसार साखर संघाशी बोलणं सुरू आहे', असंही अजित पवार म्हणाले. 'पुण्यात कोरोनातून बरे होऊन डिस्चार्ज रुग्णांची संख्या वाढतेय. ही चांगली बाब चांगली आहे. लसीकरणाची जबाबदारी राज्याने उचलावी, असं केंद्राला वाटतंय, त्यासाठी ग्लोबल टेंडर काढतोय. त्यासाठी समिती नेमतोय. महत्वाच्या व्हॅक्सीन विकत घेण्याचा ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे. फायझरचा सुद्धा यात समावेश असेल, असंही अजित पवारांनी सांगितलं. IPL 2021 : मुंबईच्या टीममध्ये असूनही अर्जुन तेंडुलकर डग आऊटमध्ये का दिसत नाही? 'सिरमच्या लसीसाठी अदर पुनावाला यांच्याशी बोलणं  मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं बोलणं झालं आहे. लवकरच ते याबद्दल काय तो निर्णय घेतील, असंही अजित पवारांनी सांगितलं. 'अनिल देशमुख यांच्याशी अजून बोलणं झालं नाही पण केंद्रीय एजन्सीमार्फत चौकशी झाल्याचं मला माध्यमातून कळलं. चौकशीला सहकार्य होईल पण ती निप्षक्ष व्हावी एवढीच माफक अपेक्षा, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केलेल्या प्रकरणावर दिली.
Published by:sachin Salve
First published: