पुणे, 3 फेब्रुवारी : काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाल्याचं जाहीर केलं. मात्र या युतीवरून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरू असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. प्रकाश आंबेडकर यांनी देखील शरद पवार यांच्यावर टीका केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीसोबत घेण्याची माझी तयारी आहे, मला इतरांचं माहिती नाही असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
अजित पवार यांनी नेमकं काय म्हटलं?
सध्या वंचित बहुजन आघाडीची शिवसेनेसोबत युती आहे. समजा पुढे आम्ही एकत्र लढलो तर पुढची निवडणूक नक्कीच वन साईडेड होईल. कारण वंचितला मानणारा मोठा वर्ग आहे. वंचितला महाविकास आघाडीसोबत घ्यायची माझी वैयक्तिक तयारी आहे. मात्र मला इतरांचं माहित नाही असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : ..अन् तिथेच उद्धव ठाकरे चुकले; शिवसेनेतील बंडाबाबत अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
'उद्धव ठाकरेंना सावध केलं होतं'
दरम्यान यावेळी बोलताना अजित पवार यांनी शिवसेनेमध्ये उद्धभवलेल्या बंडावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना त्याचवेळी सावध केलं होतं. मात्र उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांवर डोळे झाकून विश्वास ठेवला आणि खरी चूक तिथेच झाल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. मी पण उद्धव ठाकरे यांना बंडाबाबत कल्पना दिली होती, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, NCP, Prakash ambedkar, Sharad Pawar, Shiv sena