• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • पार्थ प्रकरणावर प्रश्न विचारताच अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले...

पार्थ प्रकरणावर प्रश्न विचारताच अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले...

कार्यक्रमानंतर अजित पवारांना पार्थ प्रकरणावर प्रश्न विचारण्यात आला. ते या विषयावर अजुन बोलले नसल्याने त्यांच्या प्रतिक्रियेबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती.

  • Share this:
पुणे 23 ऑगस्ट: पुण्यात रविवारी उपमुख्यंमत्री अजित पवार यांच्या हस्ते कोरोना रुग्णांसाठी जम्बो हॉस्पिटलचं उद्घाटन करण्यात आलं. 600 बेड्सची सोय या हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आहे. कोरोनाची स्थिती आणि पुढची गरज लक्षात घेऊन हे हॉस्पिटल उभारण्यात आलं आहे. यावेळी कार्यक्रमानंतर अजित पवारांना पार्थ प्रकरणावर प्रश्न विचारण्यात आला. या विषयावर अजित पवार अजुन काहीही बोलले नाहीत. ते बोलतील अशी पत्रकारांना आशा होती. मात्र याही वेळी अजित पवारांनी कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. ज्या विषयावर मी काही बोलणारच नाही त्या विषयावर विचारून काय फायदा असं ते म्हणाले. या प्रकरणावर राष्ट्रवादीमध्ये बरीच चर्चा झाली होती. त्यानंतर राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण झालं होतं. सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी आणि राम मंदिराच्या मुद्यावरून पार्थ पवारांनी पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेतली होती. त्यावरून शरद पवारांनी पार्थ पवारांना जाहीरपणे फटकारलं होतं. आणखी काय म्हणाले अजित पवार? जम्बो हॉस्पिटल वेळेत बांधल्याबद्दल पुणे प्रशासकीय यंञणेचे आभार. कोरोनाच्या बाबतीत आपल्याला गाफिल राहून चालणार नाही.  दुसरी लाट येऊ नये, यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.  व्हेंटिलेटरपेक्षा ऑक्सिजन बेड्स महत्वाचे आहेत. ते जम्बो हॉस्पिटल 600चं आहे याचा आनंद आहे. दिल्लीला बॉम्बस्फोटांनी हादरविण्याचा डाव, दहशतवाद्याच्या घरात सापडला साठा उच्च प्रतीचं हे जम्बो हॉस्पिटल बांधलं गेलंय. कोविड आणि पावसाळ्यातील साथीचे आजार नियंत्रणात आलेच पाहिजे. पुढचे चार महिने आपल्याला अशीच काळजी घ्यावी लागेल. लस येईपर्यंत आपल्या सर्वांना काळजी घ्यावीच लागेल. जनजीवन परत रुळावर आणतांना गर्दी ही अपरिहार्य आहे पण खबरदारी घ्यावीच लागेल. त्यासाठी जनजागृती वाढवावी लागेल. SSR Death: 13 आणि 14 जूनच्या रात्री नेमकं काय झालं? त्या तिघांना घेऊन CBI पुन्हा प्रत्येक राज्याची भौगोलिक परिस्थिती वेगळी असते त्यामुळे ई पास बाबत मुख्यमंत्र्यांशी बोलूनच अंतिम निर्णय घेऊ अशी माहितीही अजित पवारांनी दिली.
Published by:Ajay Kautikwar
First published: