दादा, तुम्ही DCM झालंच पाहिजे, कार्यकर्त्याच्या मागणीला अजित पवारांनी दिलं हे उत्तर

दादा, तुम्ही DCM झालंच पाहिजे, कार्यकर्त्याच्या मागणीला अजित पवारांनी दिलं हे उत्तर

'फडणवीसांना मी पणाचा फटका बसला. तिन्ही पक्षांनी वाद टाळले तर पाच वर्षे सरकार चालेल असंही त्यांनी सांगितलं.'

  • Share this:

चंद्रकांत फुंदे, पुणे 14 डिसेंबर : पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित आमदारांचा अजित पवारांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला. आघाडी सरकारच्या स्थापनेनंतरचा राष्ट्रवादीचा हा पहिलाच कार्यकर्ता मेळावा होता. त्यात अजित पवार येणार असल्याने सगळ्यांचं लक्ष लागलं होतं ते अजित पवारांच्या भाषणाकडे त्यामुळे दादा काय बोलतात याची कार्यकर्ते वाट बघत होते. अजित पवारांनी फडणवीसांसोबत जात सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे त्यांच्याबद्दल राष्ट्रवादीत वेगळं मत तयार झालं होतं. कार्यकर्त्यांनी भर सभेत अजित पवारांना तुम्ही मुख्यमंत्री व्हा अशी गळ घातली. कार्यकर्त्यांच्या या मागणीला दादांनी संयमाने उत्तर दिलं आणि तुमच्या भावना कळाल्या असं सांगत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमान बोलताना अजित पवार म्हणाले, डिसेंबर संपायच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. राष्ट्रवादीला सरकारमध्ये 15 मंत्रिपदं धरून 17 पदं मिळालीत. यावेळी नवीन खाती घेण्याचा प्रयत्न आहे. विकासकामे मार्गी लावण्यासाठीच अर्थ खातं राष्ट्रवादीकडे ठेवलं.

राजकारणात पुन्हा खळबळ, शिवसेनेला भाजपची आणखी एक ऑफर

शहरांसाठी महत्वाचे गृहनिर्माण आपल्याकडे घेतलं आहे. सहकार आपल्यासाठी महत्वाचं म्हणूनच राष्ट्रवादीकडे घेतलं आहे. थेट सरपंच निवड विकासाला अडचणीची त्यामुळे त्यात बदल होऊ शकतो अर्थात आघाडीला विश्वासात घेऊनच करणार आहोत.

राष्ट्रवादी अजून एखादं खातं मिळू शकते, थोडं थांबा असं त्यांनी गृह खात्यासंदर्भात सूचक विधान केलं. त्याच वेळी कार्यकर्त्यांनी दादा, तुम्ही डीसीएम झाले पाहिजे... अशी भरसभेत मागणी केली. त्यावर अजित पवारांनी सगळ्यांना, थांबा जरा थोडं थांबा असं सांगत शांत राहण्याचा सल्ला दिला.

'तुम्ही व्यापारी असाल तुमच्या घरचे', शिवसेनेचे मोदी सरकारवर टीकास्र

अजित पवार पुढे म्हणाले, आयारामांना लगेच रेड कार्पेट नकोच. उगवत्या सूर्यांना नमस्कार करणारे भरपूर जण पक्षात येण्याचा प्रयत्न करतील. पण सगळ्यांनाच तपासूनच घेणार आहोत.काही लोकं तिकडे गेल्यानं पक्षाचं ओझं कमी झालं. साहेबांच्या सातारच्या सभेनं हवा झाली, ईडीने वातावरण बदललं. फडणवीसांना मी पणाचा फटका बसला. तिन्ही पक्षांनी वाद टाळले तर पाच वर्षे सरकार चालेल असंही त्यांनी सांगितलं.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 14, 2019, 3:55 PM IST
Tags: ajit pawar

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading