दादा.. किमान 7 तास तरी झोपू द्या, सकाळी उठण्यावरून अजित पवारांच्या आव्हाडांना कानपिचक्या

दादा.. किमान 7 तास तरी झोपू द्या, सकाळी उठण्यावरून अजित पवारांच्या आव्हाडांना कानपिचक्या

सूर्यमुखी असणाऱ्यांनी जरा लवकर उठायची सवय लावून घ्या. तुम्ही सात ऐवजी पहाटे 4 ला निघायला हवं होतं.

  • Share this:

पुणे 8 फेब्रुवारी : अजित पवारांच्या कामाच्या स्टाईलचा अनुभव आजा पुन्हा एकदा सगळ्यांना आला. आज शनिवार असूनही अजित पवार सकाळी 7 पासूनच कामाला लागले होते. पुण्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणच्या नुतन कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते झालं. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते. या कार्यक्रमात अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली. उशिरा उठण्याच्या मुद्यावरून अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या.

यापुढे अजित पवारांनी पुण्यातील कार्यक्रम थोडे उशिराने घेण्याची विनंती केली होती. त्यावर बोलताना, तुम्ही सात ऐवजी पहाटे चारलाच उठत चला जेणेकरून सातला कामाला लागता येईल, असा टोला लगावत अजित पवारांनी आव्हाडांची विनंती तिथल्या तिथेच फेटाळून लावली.

मला कुणाच्याही परवानगीची गरज नाही, शरद पवारांचा वारकरी परिषदेला टोला

जितेंद्र आव्हाड पवार म्हणाले, दादा किमान 6 ते 7 तास तरी झोप झाली पाहिजे. त्यावर अजित पवार म्हणाले, सूर्यमुखी असणाऱ्यांनी जरा लवकर उठायची सवय लावून घ्या, जितेंद्र, तुम्ही सात ऐवजी पहाटे 4 ला निघायला हवं होतं. सात वाजता उठायचं नाही तर कामाला लागायचं असतं.

शिल्पा शेट्टीच्या योगा क्लासनं Bigg Boss च्या स्पर्धकांना फुटला घाम, पाहा VIDEO

टीडीआरच्या बाबतीत पुण्याची मुंबईशी बरोबरी होऊ शकत नाही. दोन्ही शहरांची परिस्थिती वेगवेगळी आहे. असं म्हणत त्यांनी आव्हांडा मुद्दाही खोडून काढला. ते पुढे म्हणाले, अधिकाऱ्यांनी फार नियमांवर बोट ठेऊन चालू नये. त्यातून व्यवहारी मार्ग काढला पाहिजे. मी तर आता झोपुच्या प्रकल्पांचा दर आठवड्यालाच आढावा घेणार आहे काम चांगलं झालं तर किरकोळ चुकाही पोटात घेऊ पण कामं झाली नाहीत तर साईड पोस्टिंगचा पर्याय वापरू असा प्रेमळ दम कामचुकार अधिकाऱ्यांना अजित पवारांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ajit pawar
First Published: Feb 8, 2020 02:30 PM IST

ताज्या बातम्या