Home /News /pune /

बहुजन समाजातून पुढे आलेल्या धनंजयला नाहक त्रास दिला, अजित पवार भाजपवर भडकले

बहुजन समाजातून पुढे आलेल्या धनंजयला नाहक त्रास दिला, अजित पवार भाजपवर भडकले

'धनंजय मुंडे यांच्या नावाने तरुण नेतृत्व समोर आले आहे. पंकजा मुंडे सारख्या कॅबिनेट मंत्र्याचा पराभव केला.

पुणे, 22 जानेवारी : राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कारचे गंभीर आरोप करणाऱ्या रेणू शर्माने आपली तक्रार मागे घेतली, त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. बहुजन समाजातून आलेल्या माझ्या सहकाऱ्याला नाहक त्रास झाला, तो बदनाम होतो, त्याचं कुटुंब डिस्टर्ब होतं, त्याला वाली कोण? असा परखड सवाल उपस्थितीत करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर टीका केली. पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण करत भाजपला धारेवर धरले. 'सामाजिक आणि राजकीय जिवनात काम करत असताना अचानक कुणी तरी येते आणि तक्रार करते. त्या तक्रारीमुळे एका झटक्यात नेत्याची प्रतिमा मलिन होते. लोकांच्या बघण्याचा दृष्टीकोन बदलून जातो. भाजपच्या लोकांनी आंदोलनं केली. राजीनाम्याची मागणी केली. ज्यांनी ज्यांनी राजीनाम्याची मागणी केली, त्यांनी पूर्ण माहिती न घेता वक्तव्य केली. आता याला जबाबदार कोण आहे? असा सवाल अजित पवारांनी उपस्थितीत केला. 'धनंजय मुंडे यांच्या नावाने तरुण नेतृत्व समोर आले आहे. पंकजा मुंडे सारख्या कॅबिनेट मंत्र्याचा पराभव केला. आघाडी सरकारमध्ये पवार साहेबांनी मोठी जबाबदारी दिली. ते त्यांचं काम करत होते. बहुजन समाजातून पुढे आलेला एक सहकारी, तो बदनाम होतो, त्याचं कुटुंब डिस्टर्ब होतं, त्याला वाली कोण? अशी विचारणाच अजित पवारांनी केली. 'एखादी राजकीय व्यक्ती काम करत प्रचंड काम करावं लागतं, कष्ट घ्यावे लागतात, पण असं जे घडतं तेव्हा त्याला एक क्षणात पायउतार व्हावं लागतं, याचा सगळ्यांनी गांभीर्याने विचार करायला पाहिजे', असा सल्लावजा टोलाही अजित पवार यांनी भाजपला लगावला. 'धनंजय मुंडे यांना आम्ही पाठीशी घालतोय असे आरोप झाले. आम्ही संपूर्ण तपास होऊ द्या, सत्य बाहेर येऊ द्या म्हणत होतो. पण धनंजय मुंडे आणि आमच्या पक्षाची बदनामी झाली, असंही पवार म्हणाले. 'म्हाडाच्या घरासाठी नंबर निघाला तर आमच्याबद्दल चांगलं बोला, नाही आला तर आमचा पायगुण वाईट आहे, असं म्हणू नका', अशी टोलेबाजीही त्यांनी केली. 19 नगरसेवक संपर्कात आहे का? 'काही जण वारे बदलते तसे बदलतात. किंवा त्यांची काही विकास काम करून घ्यायची असतील. पण बेरजेचे राजकारण करायचं असतं, इलेक्टिव्ह मेरिट बघायचा असते, असं सूचक विधान अजित पवार यांनी पुण्यातील 19 नगरसेवक संपर्कात असल्याच्या प्रश्नावर केले. शहरात लसीकरणाचे प्रमाण कमी 'कोरोना लसीकरणाबाबत अडचणी आहेत. ग्रामीण भागात प्रमाण जास्त आहे. 60/65 टक्के लसीकरण झालं. मात्र शहरात 25 / 30 टक्केच लोकांनी लस घेतली. लोक ऐनवेळी निर्णय बदलतात. कोविन ॲपची समस्या आहे. अशी कारणे आहे.   खासगी डॉक्टर्स ना पण लस द्यावी अशी मागणी आहे. त्याबाबत निर्णय घेऊ, अशी माहितीही पवारांनी दिली. 'विकास करत असताना झाडं तोडणे चुकीचे, आपण झाडं लावली पाहिजे. नवीन इमारती बांधताना पर्यावरणाचं संरक्षण झालं पाहिजे. पर्यावरण नष्ट झालं तर त्याचा फटका वन्य प्राण्यांना बसतोय. उद्या माणसांना बसेल. पुण्यात गवा आला, पण त्याचा जीव गेला. जंगली जनावरं नागरी वस्तीत आलं तर आपण स्वत:ला सुरक्षित ठेवून त्या प्राण्याचा जीव वाचवायला पाहिजे. आपला जीव महत्त्वाचा आहे तसा त्याचाही जीव महत्त्वाचा आहे, असंही पवार म्हणाले.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Ajit pawar

पुढील बातम्या