Ajit Pawar in Pune: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज पुण्यात बारा तासांचा मॅरेथॉन दौरा सुरू आहे. या बारा तासांत ते 17 ठिकाणी जातील आणि 31 प्रकल्पाचं उद्घाटन करणार आहेत.
पुणे, 13 मार्च : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली (Mumbai Police sent notice to Devendra Fadnavis) आहे. देवेंद्र फडणवीस यांना बजावण्यात आलेल्या या नोटीसवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देत खास सल्ला दिला आहे. अजित पवार म्हणाले, नोटीस देणं अशी परिस्थिती आपल्या देशात कधीच नव्हती. वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करणं असं नव्हतं. मी देशाच्या पंतप्रधानांच्यासमोर देखील त्याच्या संदर्भात थोडफार वक्तव्य केलं होतं. प्रत्येकाने आप-आपलं काम करावं. जनतेने ज्यांना पाठिंबा दिला आहे, लोकशाहीत जनता ज्यांच्या पाठिशी आहे त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करावं असं माझं मत आहे.
जबाबदार व्यक्तीने कसं काम केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कसं सर्वांना सोबत घेऊन गेलं पाहिजे हे सर्व स्तरावर जर झालं... लोकांना एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप ऐकण्यात काहीही रस नाहीये. नागरिकांचे प्रश्न सुटावेत. पण हे प्रश्न राहतात बाजूला आणि कुणीतरी काही वक्तव्य करतं तर कुणी नोटीस पाठवतं. यामध्ये वेळ घालवू नका आणि विकासाला महत्त्व दिलं पाहिजे असंही अजित पवार म्हणाले.
वाचा : पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी केला आणखी एक गौप्यस्फोटअजित पवारांचा 12 तासांचा मॅरेथॉन दौरा, 31 प्रकल्पांचे उद्घाटन
आज उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात बारा तासांचा मॅरेथॉन दौरा करत आहेत. या बारा तासात ते 17 ठिकाणी जातील आणि 31 प्रकल्पाचं उद्घाटन करणार आहेत. पुणे महानगरपालिकेच्या नगरसेवकांच्या कार्यकाळाची मुदत संपत 14 मार्च रोजी संपत असल्यामुळे एकाच दिवशी कार्यकर्त्यांना उद्घाटनासाठी वेळ देत सकाळी 7 पासून उद्घाटनाचा धडाका सुरू केला आहे. मुदत संपल्यावर परत उद्घाटन करता येणार नसल्याने अजित पवारांचा उद्घाटनाचा मॅरेथॉन दौरा आयोजित करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांची देवेंद्र फडणवीसांना नोटीस
देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील अधिकाऱ्यांचा बदली घोटाळा मी उघडकीस आणला होता. दिल्लीत केंद्रीय गृहसचिव यांना मी सगळी माहिती सादर केली. कोर्टानं त्याचं गांभीर्य ओळखून CBI ला चौकशी करण्याचे आदेश दिले. ऑफिशियल सीक्रेट माहिती लीक कशी झाली याचा FIR महाराष्ट्र पोलिसांनी दाखल केला. ऑफिशिअल सीक्रेट अॅक्ट नुसार राज्य सरकारने गुन्हा दाखल केला आहे. मला पोलिसांनी नोटीस पाठवून प्रश्न विचारले. विरोधी पक्षनेते म्हणून मला माहितीचा स्त्रोत विचारला जाऊ शकत नाही. मला काल CRPC नोटीस मुंबई पोलिसांनी पाठवली. उद्या 11 वाजता BKC सायबर ठाण्यात बोलावलं आहे.
पोलीस चौकशीला सामोरं जाणार
ही सगळी माहिती मी भारत सरकार गृहसचिवांनी दिली आहे. ही माहिती मी बाहेर कुठे बोललो नाही. पण राज्यातील मंत्र्यांनी ही माहिती बाहेर दिली. माझ्याकडे पुरावे आहेत. माझ्या माहितीचा स्त्रोत सांगणं मला बंधनकारक नाहीये. पोलिसांनी चुकीची केस केली असली तरी मी जाणार, पोलिसांना सहकार्य करणार आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुंबई पोलीस फडणवीसांच्या घरी जाणार
मुंबई पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसाठी आज बोलावले होते. मात्र, नंतर मुंबई पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन आम्हीच तुमच्या घरी येऊ तुम्हाला पोलीस स्टेशनला येण्याची आवश्यकता नसल्याचं सांगितलं. त्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी काल सायंकाळी ट्विट केलं.
मी माझे उद्याचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले असून, दिवसभर घरी उपलब्ध असेन. ते केव्हाही येऊ शकतात.
जयहिंद, जय महाराष्ट्र !
आपल्या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले, "सहपोलिस आयुक्त, गुन्हे यांचा दूरध्वनी मला आत्ता आला होता. त्यांनी सांगितले की, तुम्ही पोलिस स्टेशनला येण्याची आवश्यकता नाही. आम्हीच घरी येऊन तुमच्याकडून आवश्यक ती माहिती घेऊ. मी माझे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले असून, दिवसभर घरी उपलब्ध असेन. ते केव्हाही येऊ शकतात. जयहिंद, जय महाराष्ट्र !"
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.