Home /News /pune /

Ajit Pawar : सेल्फ किट विकत घेऊन कोरोनाची चाचणी करताय? अजित पवारांनी सांगितले नवे बदल

Ajit Pawar : सेल्फ किट विकत घेऊन कोरोनाची चाचणी करताय? अजित पवारांनी सांगितले नवे बदल

उपमुख्यमंत्री अजित पवार (फाईल फोटो)

उपमुख्यमंत्री अजित पवार (फाईल फोटो)

आपल्याला कोरोनाची लागण झालीय का याची तपासणीसाठी बाजारात सेल्फ किटही मार्केटमध्ये आली आहे. पण सेल्फ किटमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर नागरिकांनी प्रशासनाला त्याची माहिती दिली नाही तर कोरोनाचा विळखा वाढण्याचा धोका आहे.

    पुणे, 15 जानेवारी : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुंबई आणि पुणे शहरात कोरोनाचा हाहा:कार माजलेला बघायला मिळतोय. कोरोनाबाधितांची संख्या दररोज वाढताना दिसतोय. विशेष म्हणजे आपल्याला कोरोनाची लागण झालीय का याची तपासणीसाठी बाजारात सेल्फ किटही मार्केटमध्ये आली आहे. पण सेल्फ किटमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर नागरिकांनी प्रशासनाला त्याची माहिती दिली नाही तर कोरोनाचा विळखा वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सेल्फ किट विकणाऱ्या मेडिकलसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सेल्फ किट विकणाऱ्या मेडिकल्सला आता ते किट विकत घेणाऱ्यांचा मोबाईल नंबर नमूद करणं अनिवार्य असेल, असं अजित पवारांनी सांगितलं. पुण्यात कोरोनाच्या आढावा बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. अजित पवार नेमकं काय म्हणाले? "शहरी भागात एक नवीन किट समोर आलेले आहेत. ते किट पाहून आपण पॉझिटिव्ह आहेत की नाही ते चेक करता येत आहे. तुम्ही तुमच्या घरात किट आणून टेस्ट केलं आणि प्रशासनाला माहिती दिली नाही तर आम्हाला कळणार नाही. त्यामुळे जे मेडिकल असे किट विकत आहेत त्यांना किट घेणाऱ्याचा मोबाईल नंबर घेण्याचा सल्ला दिलेला आहे. जेणेकरुन आम्ही आमच्याकडून फोन करुन विचारु", असं अजित पवार यांनी सांगितलं. हेही वाचा : भारताचं स्वप्न मोडणाऱ्यावर रवी शास्त्री फिदा, पीटरसनला पाहून आठवला दिग्गज भारतीय 'मुलांना शाळेत बोलावून लसीकरण करण्याचा निर्णय' "आज शनिवारी कोरोना आढावा बैठक झाली. याआधी जी नियमावली जाहीर केली गेली आहे त्या नियमावलीमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींसाठी लसीकरण सुरु केलंय. मुला-मुलीचं ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात लसीकरण झालं आहे. त्याप्रमाणेच पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मुला-मुलींना शाळेत लसीकरणासाठी बोलावलं तर मोठ्या प्रमाणात लसीकरण होईल. आजपर्यंत 43 टक्के लसीकरण झालेलं आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसी शिल्लक नाहीत. पण पुणे जिल्ह्यात लसी आहेत. लस घेण्याबद्दलचा निर्णय भारत सरकारने घेतलेला आहे. यामध्ये 60 वर्ष वयाच्या सर्वांनी लस घ्यावी. त्यांनी दुसरी लस उशिरा घेतली असल्यामुळे त्या लसीत आणि बुस्टर डोसमध्ये अंतर राहिलं पाहिजे", असं त्यांना सांगितलं. 'पुणे जिल्ह्याला 9 कोटी, तर सातारा-सोलापूरला प्रत्येकी 10 कोटींचा निधी' "मुंबई-पुण्यात काही पोलिसांना कोरोना झाला होता. आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे. आता फक्त तीनच पोलीस रुग्णालयात उपचार घेत आहेत. आता जेवढ्या प्रमाणात रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यापैकी फार कमी रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड लागत आहेत. सगळी तयारी आपण करुन घेतली आहे. आम्ही SDRF मधून पैसे देण्याचा निर्णय घेतले आहेत. पुणे जिल्ह्याला 9 कोटी, सोलापूर जिल्ह्याला 10 कोटी, सातारा जिल्ह्याला 10 कोटी रुपये असा निधी दिलेला आहे. ते आलेले आहेत. त्यामुळे मागचे काही बिलं चुकून राहिले असतील तर ते त्यातून क्लिअर करता येतील", असं अजित पवार म्हणाले. हेही वाचा : 'बचपन का प्यार' फेम Sahdev Dirdo अपघातानंतर नव्या क्षेत्रात ठेवणार पाऊल "पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या आयुक्त आणि महापौरांना लसीकरण मोठ्या प्रमाणात कसं होईल, यासाठी प्रयत्न करण्यास सांगितलं आहे. कारण लसीकरणामुळे कोरोनाची तेवढी तीव्रता राहत नाही. मागील आठवड्याच्या तुलनेत पुणे जिल्ह्यात 10.6 पॉझिटिव्ह रेटने वाढ झालेली आहे. साधारणपणे 30 हजार 12 नवे कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झालेली आहे. बाकीच्या बाहेरच्या देशात मोठी लाट आलेली आहे. फ्रान्समध्ये सर्वात मोठी लाट आलेली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेला दैनंदिन मृत्यूमध्ये घट झालेला आहे. भारतामध्ये साधारण 17 राज्यांमध्ये ओमायक्रोनचा प्रसार झाला आहे", असंदेखील अजित पवार यावेळी म्हणाले. 'विनामास्क फिरणाऱ्या 9 हजार 270 नागरिकांवर कारवाई' "नियमांची शिस्त लागण्याकरता दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला होता. मास्क न वापरणाऱ्यांना 500 रुपये दंड, मास्क वापरलं नाही आणि थुंकला तर 1000 रुपये दंड जाहीर केला आहे. विनामास्क फिरणाऱ्या 9 हजार 270 नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यातून 46 लाख 35 हजार रुपये दंड वसूल केलेला आहे. अजूनही दुर्देवाने काही लोक विनामास्क फिरत आहेत. त्या सगळ्यांना माझं आवाहन आणि विनंती आहे, आपल्याला मास्क वापरलाच पाहिजेय", असं अजित पवार म्हणाले.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या