Home /News /pune /

'काहींनी दूध घेतल्यावर नाही तेच सुरू होतं' अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीवर एकच हशा पिकला

'काहींनी दूध घेतल्यावर नाही तेच सुरू होतं' अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीवर एकच हशा पिकला

Ajit Pawar in Pune tour: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी सात वाजल्यापासूनच आपल्या दौऱ्याला सुरुवात करत विविध विकास कामांची पाहणी करण्यास सुरुवात केली.

मुंबई, 16 जुलै : पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे सकाळीच अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसून आले. सकाळी सात वाजण्यापूर्वीच अजित पवार हे पुण्यातील बाणेर (Baner Pune) परिसरात असलेल्या कोविड रुग्णालयाला (Covid Hospital) भेट देण्यासाठी दाखल झाले. विविध विकास कामांच्या पाहणी करण्यासाठी आज सकाळपासूनच अजित पवारांचा दौरा सुरू झाला आहे. आज अजित पवार हे कोविड परिस्थितीचा आढावा घेणारी बैठकही घेणार आहेत. अ‍ॅक्शन मोडमध्ये असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मिश्किल मूड सुद्धा आज पहायला मिळाला. अजित पवारांचा मिश्किल मूड अजित पवार यांनी आज सकाळी पाच मजली कोविड हॉस्पिटलच्या इमारतीची पाहणी केली. इमारती मधील तळ मजल्यावर एका केबिन चर्चा सुरू असताना सर्वांसमोर चहा, बिस्किट आणि काही वेळाने दुधाचे ग्लास देखील ठेवण्यात आले. तेवढ्यात अजित पवारांनी दूध घेण्यास सुरुवात केली. काही जण दूध घेत नसल्याचं पाहून अजित पवार म्हणाले, काहींनी दूध घेतल्यावर नाही तेच सुरू होत, असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. Pooja Chavan Suicide case: माजी मंत्री संजय राठोड यांना पुणे पोलिसांची क्लीन चिट? अजित पवार पुढे म्हणाले की, मला आणि आयुक्तांना सवय आहे म्हणून दूध घेतो. काहीजण दुधाच्या ग्लासाला हात लावायला तयार नाहीत. त्यामुळे काहींना दुधाची अ‍ॅलर्जी पण असते किंवा काही जण पीत देखील नसल्याचे त्यांनी म्हटलं. पुण्यात सवलत नाहीच, निर्बंध कायम महापालिकेच्या हद्दीत सध्या लागू असलेले नियमच कायम राहणार असल्याचं नव्या आदेशात स्पष्ट झालं आहे. यामुळं व्यापारी, हॉटेल व्यावसायिक यांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुणे शहरात positivity दर 5 टक्क्यांच्या खालीच आहे. मात्र असं असूनही बंधनं शिथील करायला प्रशासन तयार नाही. आज पालकमंत्री अजित पवार हे नेहमीप्रमाणे शुक्रवारी कोरोना बाबत आढावा बैठक घेतील. मात्र पुणे पालिकेने आधीच आदेश काढून निर्बंध कायम राहतील असे आदेश काढल्याने आजच्या बैठकीनंतर निर्बंध शिथील होण्याची शक्यता धूसर झाली आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Ajit pawar, Pune

पुढील बातम्या