पुणे 23 ऑगस्ट: देशातल्या अनेक राज्यांमध्ये असलेले प्रवासी आणि माल वाहतूकीचे निर्बंध काढून टाका असा सल्ला केंद्राने राज्य सरकारला दिला होता. त्यानंतर राज्यातल्या आंतर जिल्हा प्रवासासाठी असलेले नियम शिथिल होणार का? असे प्रश्न विचारले जाऊ लागले. सध्या राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जातांना ई पासची गरज लागते. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सरकारची भूमिका स्पष्ट केली.
अजित पवार म्हणाले, केंद्राचं त्याबाबतचं पत्र आलेलं असलं तरी प्रत्येक राज्याची भौगोलिक परिस्थिती ही वेगळी असते. याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करूनच घेतला जाणार आहे. पुण्यात कोविड रुग्णांसाठीच्या जम्बो हॉस्पिटलच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
त्यामुळे राज्यात सध्यातरी आंतरजिल्हा बंदी उठविण्यात येणार नाही असेच संकेत अजित पवारांनी दिले आहेत. राज्य सरकारने बसच्या आंतरजिल्हा प्रवासासाठी परवानगी दिली आहे. मात्र खासगी वाहतुकीला मात्र बंदी असून ई पास गरजेची आहे.
पार्थ प्रकरणावर प्रश्न विचारताच अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले...
सरकारच्या याच नियमांवर टीका केली जात आहे. बसला परवानगी असतांना खासगी गाड्यांवर का बंदी असे प्रश्न आता विचारले जात आहेत. त्यामुळे सरकार 30 ऑगस्ट नंतर यावर निर्णय घेण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
आणखी काय म्हणाले अजित पवार?
जम्बो हॉस्पिटल वेळेत बांधल्याबद्दल पुणे प्रशासकीय यंञणेचे आभार. कोरोनाच्या बाबतीत आपल्याला गाफिल राहून चालणार नाही. दुसरी लाट येऊ नये, यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. व्हेंटिलेटरपेक्षा ऑक्सिजन बेड्स महत्वाचे आहेत. ते जम्बो हॉस्पिटल 600चं आहे याचा आनंद आहे.
उच्च प्रतीचं हे जम्बो हॉस्पिटल बांधलं गेलंय. कोविड आणि पावसाळ्यातील साथीचे आजार नियंत्रणात आलेच पाहिजे. पुढचे चार महिने आपल्याला अशीच काळजी घ्यावी लागेल. लस येईपर्यंत आपल्या सर्वांना काळजी घ्यावीच लागेल.
दिल्लीला बॉम्बस्फोटांनी हादरविण्याचा डाव, दहशतवाद्याच्या घरात सापडला साठा
जनजीवन परत रुळावर आणतांना गर्दी ही अपरिहार्य आहे पण खबरदारी घ्यावीच लागेल. त्यासाठी जनजागृती वाढवावी लागेल
प्रत्येक राज्याची भौगोलिक परिस्थिती वेगळी असते त्यामुळे ई पास बाबत मुख्यमंत्र्यांशी बोलूनच अंतिम निर्णय घेऊ अशी माहितीही अजित पवारांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.