Home /News /pune /

अजित पवारांना दणका, माळेगाव साखर कारखाना जिंकूनही महिनाभर राहावे लागणार बाहेर

अजित पवारांना दणका, माळेगाव साखर कारखाना जिंकूनही महिनाभर राहावे लागणार बाहेर

4 एप्रिलपर्यंत जुनंच संचालक कामकाज पाहणार असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

बारामती, 6 मार्च: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना मुंबई उच्च न्यायालयाच दणका दिला आहे. माळेगाव साखर कारखाना जिंकूनही एक महिना बाहेर राहावे लागणार आहे. 4 एप्रिलपर्यंत जुनंच संचालक कामकाज पाहणार असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक 25 फेब्रुवारी रोजी पार पडली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निलकंठेश्वर पॅनल गटाने या निवडणुकीत बाजी मारत विजय मिळवला. कारखान्याच्या नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड रविवारी 8 मार्च रोजी होणार होती. मात्र, मावळते अध्यक्ष व अजित पवारांचे विरोधक रंजन तावरे यांनी राज्यघटनेच्या नव्या घटनादुरुस्तीचा आधार घेत त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला नाही, असं सांगत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. हेही वाचा...येस बँकेला रुळावर आणण्यासाठी सरकारचा प्लान तयार, SBI करणार मोठी गुंतवणूक दुसरीकडे अजित पवार यांच्या समर्थकांनी व संचालकांनी निवडून येताच कारखान्याचा कारभार हातात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्याला विरोध केल्याने काही वेळ वादही झाला होता. त्यामुळे कारखान्यावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे विद्यमान अध्यक्ष रंजन तावरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावरती न्यायालयाने रंजन तावरे यांची बाजू ऐकून घेत त्यांचा कार्यकाळ पूर्ण करण्याचा निर्णय शुक्रवारी दिला. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे अजित पवार यांच्या संचालक मंडळाला एक महिना कारखान्याच्या कारभारापासून लांब राहावे लागणार आहे. हेही वाचा..वर्षा बंगल्याच्या भिंतीवरच्या 'त्या' मजकुराबद्दल अमृता फडणवीस यांनी दिलं स्पष्टीकरण दादांनी काढला पराभवाचा वचपा.. बारामतीमधील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजिप पवारांच्या पॅनलने बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत निलकंठेश्वर पैनलला 11 जागा मिळाल्या आहेत. तर सहकार बचाव शेतकरी पैनलला 5 जागा विजयी झाल्या आहेत. सत्ताधारी रंजन तावरे आणि चंद्रराव तावरे या गटाला फार मोठा धक्का बसला असून पुढील राखीव पाच जागांसाठी मतमोजणी होत आहे. या सर्व जागांवर राष्ट्रवादीचे निलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यातून गेलेला हा कारखाना पुन्हा सत्ताकाबीज केला आहे असंच म्हणावं लागेल. हेही वाचा... अमिताभ बच्चन यांनी सांगूनही अर्थसंकल्पाच्या भाषणात अजित पवारांनी केली मोठी चूक माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीत 21 जागांसाठी या दोन्ही पॅनलसह अन्य 14 अपक्ष असे एकूण 56 उमेदवार रिंगणात आहेत. 23 फेब्रुवारीला या निवडणुकांसाठी मतदान झालं असून 224 तारखेपासून मतमोजणी सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावेळी आपला मतदान हक्क बजावला होता. या कारखान्याचे सभासद राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आहेत. त्यामुळे या कारखान्याच्या नावलौकिक महाराष्ट्र भर आहे. सध्या या कारखान्यावर पवार विरोधी गटाची सत्ता आहे. पण आता ही सत्ता अजित पवारांनी खेचून घेतली आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Ajit pawar, Baramati, Sharad pawar

पुढील बातम्या