Home /News /pune /

'ड्रायव्हर म्हणून मी बसतो, साहेबांना कंडक्टर ठेवतो, सुप्रियाला तिकीट काढायला लावतो', अजित पवारांची फटकेबाजी

'ड्रायव्हर म्हणून मी बसतो, साहेबांना कंडक्टर ठेवतो, सुप्रियाला तिकीट काढायला लावतो', अजित पवारांची फटकेबाजी

अजित पवार यांच्या भाषणावेळी एका कार्यकर्त्याने काऱ्हाटीच्या शाळेत जायला बस सुरु करा, अशी मागणी केली. कार्यकर्त्याची ही मागणी ऐकल्यानंतर अजित पवारांनी ग्रामस्थांना उद्देशून टोलेबाजी केली.

पुणे, 14 मे : पुणे जिल्हा परिषद (Pune ZP) आणि नाम फाऊंडेशनच्या (Nam Foundation) वतीने बारामती (Baramati) तालुक्यातील भिलार वाडीत पाझर तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात अजित पवारांनी तुफान शाब्दिक फटकेबाजी केली. अजित पवार यांच्या भाषणावेळी एका कार्यकर्त्याने काऱ्हाटीच्या शाळेत जायला बस सुरु करा, अशी मागणी केली. कार्यकर्त्याची ही मागणी ऐकल्यानंतर अजित पवारांनी ग्रामस्थांना उद्देशून टोलेबाजी केली. "ड्रायव्हर म्हणून मी बसतो. साहेबांना (शरद पवार) कंडक्टर ठेवतो. आणि सुप्रियाला तिकीट काढायला लावतो. अरे आधीची परिस्थिती बघा. आता परिस्थिती बदलत आहे. जेव्हा शरद पवार पुण्यात असायचे तेव्हा बारामतीहुन डबा जायचा. डबा जाईपर्यंत खराब व्हायचा. आता परिस्थिती तशी नाहीय. विकास झाला. जरा फलटण, दौंड, इंदापूर, फलटणला जाऊन या आणि तिथली परिस्थिती बघा", असं अजित पवार यावेळी म्हणाले. "बारामतीत किती निधी आला ते बघा. किती निधी आला मी सांगत नाही हे चॅनलवाले लगेच दाखवतील ब्रेकिंग न्यूज म्हणून", असं अजित पवार म्हणाले. यावेळी मधेच एक ग्रामस्थ किती निधी आला ते सांगत होता. तेवढ्यात अजित पवार बोलले तू गप्प बस ना बाबा! झाकली मूठ सव्वा लाखाची, राहुदेत ना!", असं अजित पवार मिश्किलपणे म्हणाले. पाण्याचे दर कमी करा, अशी कार्यकर्त्यांची मागणी केली. त्यावरही अजित पवारांनी भाष्य केलं. "यातल्या एकाला खासदार आणि एकाला आमदार करा. यांना वाटतं आम्ही काहीच कामं करीत नाहीत. हे लोकं अशी तुमच्या समोर कामं सांगतात. मग तुम्हाला वाटतं बघा यांना किती काळजी आहे", असं अजित पवार म्हणाले. (कॅनॉट प्लेसमध्ये Navneet Rana यांच्याकडून हनुमान चालिसाचे पठण; म्हणाल्या, ''आम्ही कोणाच्या रिमोट कंट्रोलनं...'') ग्रामपंचायतीने काम वेळेत संपवली नाहीत. त्यांना आगामी काळात निधी मिळणार नाही, असं अजित पवारांनी यावेळी स्पष्ट सांगितलं. टप्या टप्याने सौर ऊर्जेचा वापर करणार. पाणी योजना सौर ऊर्जेवर आणण्याचा प्रयत्न असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. तसेच शेतीचं पाणी थेट पिकाच्या मुळाला कसं मिळेल यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी अजित पवारांनी एका ग्रामस्थाला सल्ला दिला. "संज्या पाणी बघून ऊस लाव. तू कायतरी सोसायटी आणली ना? हो दादा 13/0 झालं. कधी कधी टाकतो ते बंद कर", असा सल्ला अजित पवारांनी दिला. "लाकडी निंबोडी योजना फार जुनी आहे. सोलापूर जिल्ह्यातील लोकांचा गैरसमज काढला पाहिजे. त्यांना समजवून सांगितले पाहिजे की ही अधीचीच योजना आहे", असं पवार म्हणाले. तसेच "रस्त्याच्या कामाची तक्रार आली आहे. कोणी अडवत असेल तर त्याला उचला", असं आवाहन यावेळी अजित पवारांनी केलं.
Published by:Chetan Patil
First published:

Tags: Ajit pawar, Baramati, NCP, Pune, शरद पवार

पुढील बातम्या