शरद पवारांवरील 'पैलवान' टीकेवर अजित पवार आक्रमक, भाजपला दिलं ओपन चॅलेंज!

आमच्या विचाराचे आमदार निवडून आणा 3 महिन्यात सात-बारा कोरा करून दाखवतो अशा शब्दात अजित पवार यांनी भाजप आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 17, 2019 07:12 AM IST

शरद पवारांवरील 'पैलवान' टीकेवर अजित पवार आक्रमक, भाजपला दिलं ओपन चॅलेंज!

शिरुर, 17 ऑक्टोबर : समोर पहिलवान दिसत नाही असं मुख्यमंत्री म्हणतात, मग पंतप्रधानांसह  केंद्रीय मंत्री का महाराष्ट्रात प्रचाराला बोलावता असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्ही सत्तेचा माज, मस्ती कधी केली नाही. आमच्या विचाराचे आमदार निवडून आणा 3 महिन्यात सात-बारा कोरा करून दाखवतो अशा शब्दात अजित पवार यांनी भाजप आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. शरद पवार आता कुस्ती खेळू शकत नाही अशा प्रकारची टीका भाजपकडून करण्यात आली होती. त्यावर अजित पवार यांनी  भाजपचा आणि शिवसेनेलाही चोख उत्तर दिलं आहे.

शिरुर हवेली विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांची शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा इथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अजित पवार चांगलेच आक्रमक झाले होते. दरम्यान, गेल्या 2 दिवसांआधी सुप्रीया सुळे यांनीदेखील भाजप आणि शिवसेनेवर टीका केली होती. 'भारतरत्न' हे सरकारचं 'इलेक्शन गिमिक' असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती.  कल्याणमध्ये मंगळवारी झालेल्या राष्ट्रवादीच्या सभेनंतर सुप्रीया सुळे यांनी ही टीका केली होती. भाजपच्या संकल्पनाम्याची 'गाजरांचा पाऊस' म्हणूनही त्यांनी यावेळी खिल्ली उडवली.

भाजपनं आजच आपला संकल्पनामा जाहीर केला असून यात स्वातंत्रवीर सावरकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस करणार असल्याचं म्हटलंय. मात्र, प्रत्यक्षात आपण ही मागणी मागील 2 ते 3 वर्षांपासून लोकसभेत करत होते. त्यावेळीही यांचंच सरकार होतं, मग निवडणुका आल्यावरच यांना भारतरत्न का आठवला? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. भाजपचा संकल्पनामा म्हणजे निव्वळ गाजरांचा पाऊस असल्याची टीकाही त्यांनी केली.

इतर बातम्या - शरद पवारांचा वारसादार कोण होणार ? सुप्रिया सुळेंची संपूर्ण UNCUT मुलाखत

बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेवरून सध्या सुरू असलेल्या चर्चा निरर्थक असल्याचं सांगत भूतकाळ पुन्हा उकरून काढण्यापेक्षा वर्तमानात आपल्यापुढे काय समस्या आहेत? त्या सोडवण्याचा प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी केलं. तसंच महाराष्ट्रात जर तुमचं इतकं चांगलं काम असेल, आणि पैलवान तयार असतील, तर दिल्लीवरून मॉनिटर कशाला बोलवावे लागतात? असा सवाल उपस्थित करत सुप्रीया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 17, 2019 07:12 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...