Home /News /pune /

PM Narendra Modi: अजित पवारांनी जाहीर भाषणात पंतप्रधानांकडे केली राज्यपालांची तक्रार

PM Narendra Modi: अजित पवारांनी जाहीर भाषणात पंतप्रधानांकडे केली राज्यपालांची तक्रार

या जाहीर सभे दरम्यान उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार Ajit Pawar) यांचंही भाषण झालं.

    पुणे, 06 मार्च: आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) एकदिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मोदींनी पुणे पालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याचं अनावरण केलं. त्यानंतर मोदींच्या हस्ते मेट्रोच्या मार्गिकेचंही लोकार्पण केलं आहे. या दरम्यान एमआयटी महाविद्यालयात मोदींची जाहीर सभा होत आहे. या जाहीर सभे दरम्यान उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांचंही भाषण झालं. यावेळी अजित पवार यांनी राज्यपालांची पंतप्रधानांकडे अजित पवारांनी जाहीर तक्रार केली आहे. अजित पवार यांनी आपल्या भाषणा दरम्यान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची जाहीर तक्रार केल्याचं दिसून आलं. मला पंतप्रधानांना एक गोष्ट लक्षात आणून द्यायचं आहे काही महत्वाच्या पदावर असलेले लोक महामानवाच्या संबंधी काही वाक्य बोलत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक सावित्री बाई यांच्याबाबत काही वक्तव्य झाली आहेत, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजमाता जिजाऊ मां साहेबांच्या संकल्पनेतून स्वराज्य उभारले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक विचारांच्या सहाय्यानं समाजकार्य केलं. या कोणाबद्दल देखील असुया किंवा द्वेष न ठेवता आपल्याला विकासाचे काम पुढे न्यायचं आहे, असं म्हणत अजित पवारांनी राज्यपालांचं नाव न घेता पंतप्रधान मोदींकडे तक्रार केली आहे. काय म्हणाले होते राज्यपाल 'आमचे छत्रपती शिवाजी महाराज यांनी संकल्प केला होता आणि त्यांच्यामध्ये संकल्प पूर्ण कऱण्यासाठी समर्थ रामदास यांच्यासारखे गुरू मिळाले होते. राजा, महाराज, या सर्वांना गुरू होते. चाणक्याशिवाय चंद्रगुप्तला कोण विचारणार होतं. समर्थ यांच्या शिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारणार होतं' असं राज्यपाल म्हणाले. तसंच, 'शिवाजी महाराज हे काही चंद्रगुप्त इतके लहान नाही परंतु, त्यांच्या पाठीमागे जसा आईचा हात होता, तसेच गुरू उभे होते. समाजामध्ये गुरूचे मोठे स्थान आहे' असंही राज्यपाल म्हणाले होते.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Ajit pawar, Governor bhagat singh, Narendra modi

    पुढील बातम्या