मराठी बातम्या /बातम्या /पुणे /अजित पवारांचे निकटवर्तीय रविराज तावरे गोळीबार प्रकरण; माजी सरपंचाला अटक

अजित पवारांचे निकटवर्तीय रविराज तावरे गोळीबार प्रकरण; माजी सरपंचाला अटक

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रविराज तावरे यांच्यावरील गोळीबार प्रकऱणात बारामती पोलिसांनी माजी सरपंचला बेड्या ठोकल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रविराज तावरे यांच्यावरील गोळीबार प्रकऱणात बारामती पोलिसांनी माजी सरपंचला बेड्या ठोकल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रविराज तावरे यांच्यावरील गोळीबार प्रकऱणात बारामती पोलिसांनी माजी सरपंचला बेड्या ठोकल्या आहेत.

बारामती, 6 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रविराज तावरे (Raviraj Taware) यांच्यावर काही दिवसांपूर्वी गोळीबार (firing) झाला होता. या प्रकरणात आता पोलिसांनी एक मोठी कारवाई करत एकाला बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव जयदिप दिलीप तावरे (Jaydeep Dilip Taware) असे असून तो माजी सरपंच आहे. बारामती पोलिसांनी (Baramati Police) सोमवारी रविवारी रात्री अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे.

रविराज तावरे यांच्या पत्नी रोहिणी तावरे या जिल्हा परिषद सदस्या आहेत. 31 मे रोजी रविराज आणि रोहिणी हे घराबाहेर पडले असता त्यांच्यावर दुचाकीवरुन आलेल्या अज्ञाताने गोळीबार केला होता. गोळीबार करताच आरोपींनी पळ काढला होता.

लसीकरण सुरू असतानाच डॉक्टरची आत्महत्या; सुसाईड नोट आली समोर, वाचा काय होतं कारण...

तालुक्यातील माळेगाव येथे हा गोळीबार करण्यात आला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. जिल्हा परिषद सदस्येच्या पतीवर गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास तात्काळ सुरू केला. पोलिसांनी विविध अँगलने तपास सुरू केला होता.

गोळीबारात जखमी झालेल्या रविराज तावरे यांच्या जबाबावरुन पोलिसांनी संशयितांची नावे घेतली होती. त्यादृष्टीने पोलिसांनी आपला तपास सुरू ठेवला होता. यापूर्वी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता माजी सरपंच जयदीप तावरे याला अटक करण्यात आली आहे.

First published:
top videos

    Tags: Pune