अजितदादांना राखी बांधताना घडला गंमतीशीर प्रकार, सुप्रिया सुळेंनाही आवारले नाही हसू, पाहा हा VIDEO

अजितदादांना राखी बांधताना घडला गंमतीशीर प्रकार, सुप्रिया सुळेंनाही आवारले नाही हसू, पाहा हा VIDEO

बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी कुटुंबासोबत रक्षाबंधनाचा सण साजरा झाला.

  • Share this:

बारामती, 03 ऑगस्ट : भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधन देशभरात साजरा होत आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही  रक्षाबंधन सण कुटुंबियांसोबत साजरा केला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या  निवासस्थानी कुटुंबासोबत हा रक्षाबंधनाचा सण साजरा झाला. दरवर्षी प्रमाणे सुप्रिया सुळे यांनी अजितदादांना राखी बांधली. यावेळी कोरोनाची परिस्थितीत असल्यामुळे अजितदादा  हातातील ग्लोजसह घरी दाखल झाले होते.

सुप्रिया सुळे यांनी  अजितदादांना ओवाळून राखी बांधली. पण, झालं असं की, सुप्रियाताईंनी अजितदादांसाठी टोपी आणली होती, पण ओवळणं झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की, टोपी घालायची राहूनच गेली. त्यामुळे 'अरेच्या टोपी इथंच राहिली' म्हणून अजितदादांनाही हसू आवरले नाही. यावेळी समोरच शरद पवार सुद्धा बसलेले होते. हा प्रकार पाहून त्यांनाही हसू उमटले. राखी बांधल्यानंतर अजितदादांनी आपल्या या बहिणीचे आशिर्वाद घेतले आणि पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले. यावेळी घरी त्यांच्या आई प्रतिभा पवार आणि इतर सदस्यही हजर होते.

दरवर्षी पवार कुटुंबीयांच्या घरी मोठ्या उत्साहाने रक्षाबंधन साजरा होत असतो.  सुप्रिया सुळे यांनी हा व्हिडिओ शेअर करून सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्या दिल्या आहे.

Published by: sachin Salve
First published: August 3, 2020, 12:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading