Home /News /pune /

'मी काय पुण्यातच असतो', अजितदादांचा फडणवीसांना टोला

'मी काय पुण्यातच असतो', अजितदादांचा फडणवीसांना टोला

पुणे महापालिकेच्या भामा आस खेड प्रकल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हस्ते पार पडले.

पुणे, 01 जानेवारी : पुणे महापालिकेच्या भामा आस खेड प्रकल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये वाद झाला होता. त्यामुळे 'विरोधी पक्ष नेत्यांच्या सोयीच्या वेळेनुसार घ्या, मी काय पुण्यातच असतो' असं म्हणत अजित पवारांनी भाजपला टोला लगावला. भाजपचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या गोंधळातच पुणे महापालिकेच्या भामा आस खेड प्रकल्पाचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी अजितदादांनी आपल्या शैलीत टोलेबाजी केली.  विशेष म्हणजे, पुणे महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपच्या नेत्यांनी या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांनाही बोलवण्याची मागणी लावून धरली होती. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनाच बोलावले पाहिजे अशी भूमिका मांडली होती. त्यामुळे सुवर्णमध्य म्हणून दोन्ही नेत्यांना बोलवण्यात आले. अखेर संजीवनी मिळणार! भारतात कोरोना लशीला सशर्त मंजुरी! या वादावर अजित पवार म्हणाले की,'मी महापौरांना सांगितलं होतं, विरोधी पक्षनेत्यांच्या सोयीच्या वेळेनुसार कार्यक्रम घ्या. मी काय पुण्यातच असतो' असं म्हणत अजितदादांनी फडणवीस यांना टोला लगावला. 'पुण्याच्या विकास कामांसाठी आम्ही सदैव कटीबद्ध आहोत.  विकासकामांसाठी एकत्र येऊ, तशी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी दिलेली शिकवणूक दिली आहे' असं पवार म्हणाले. काय चाललंय काय? फ्लॅटची किंमत 7 लाख आणि विजेचं बिल आलं 77 लाख.... तसंच, पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता आटोक्यात आली आहे. त्यामुळे जम्बो हॉस्पिटल आजपासून तात्पुरतं बंद करत आहोत, गरज लागली तर परत सुरू करू' अशी माहितीही पवारांनी दिली. फडवणीसांनी दिले अजित पवारांना चहाचे आमंत्रण दरम्यान, आपल्या भाषणात बोलत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शैलीत जोरदार टोलेबाजी केली. 'पुणेकरांना या कार्यक्रमाची जेवढी उत्कंठा नव्हती, तेवढी मीडियाला होता. दोन दिवसांपासून अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर येणार म्हणून बातम्याच बातम्या ऐकायला मिळाल्या. आता मी आणि दादा एकत्र येणार असलो की दोन दिवस बातम्या चालतात आता आम्ही काय कुस्ती करणार की गाणे म्हणणार होतो. त्यामुळे अजितदादांनी एकतर माझ्याकडे चहाला यावे किंवा मला तुमच्याकडे बोलवावे, मीडियाला बातम्याच बातम्या मिळतील, असा टोला फडणवीस यांनी लगावला. पुणे महापालिकेच्या भामा आस खेड प्रकल्पाची पुणेकरांना नव वर्षाच्या दिवशी ही भेट मिळाली आहे. या प्रकल्पाच्या प्रश्नासाठी गिरीश बापट यांनी वेळोवेळी बैठका घेतला होत्या. पालिकेकडूनही चांगली योजना निर्माण झाली आहे. यापुढे पुण्याच्या प्रश्नासाठी काही अडचण जरी आली तरी तिजोरीच्या चाव्या यात अजित पवार यांच्याकडेच आहे. त्यामुळे कुठे कमी पडणार नाही, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या