Home /News /pune /

पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती

पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती

यासोबत ग्रामीण भागात खाजगी रुग्णालयात कोरोना रुग्णांना येणारी अधिकची बिल कमी करण्यासाठी ऑडिटर नेमले असून जवळपास 700 पेक्षा जास्त रुग्णांची बिलं कमी करण्यात आली.

पुणे, 11 ऑक्टोबर : पुणे, पिंपरी चिंचवड व पुण्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. रुग्णालयांकडून ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणावर येत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. मात्र, चाकण येथील एअर लिक्विड हा फ्रान्सच्या कंपनीचा प्लांट ऑक्टोबर अखेर सुरू होणार आहे. त्यामुळे पुण्यात आता ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही, ' चाकण येथील एअर लिक्विड हा फ्रान्सच्या कंपनीचा प्लांट याच महिन्यात सुरू होत आहे. 118 मॅट्रिक टन  क्षमतेची या प्लांटची उत्पादन क्षमता असणार आहे. त्यामुळे पुढील काळात पुणे, पिंपरी चिंचवड व पुण्याच्या ग्रामीण भागात ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात कोरोना आढावा बैठीत ते उपस्थित होते. तेव्हा बोलताना त्यांनी ही माहिती दिली. या सोबत 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' हा उपक्रम 40 लाख लोकांपर्यंत पोहोचल्याच डॉ.देशमुख यांनी सांगितलं. 15 ऑक्टोबरपासून उघडणार चित्रपटगृहं, सर्वात आधी 'हा' सिनेमा होणार प्रदर्शित तसंच, जिल्ह्यात कोरोना रुग्ण कमी होत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. खाजगी हॉस्पिटलमध्ये मागील महिन्यात ऑक्सिजनचा तुटवडा होता, पण तो आता नाही. बेड व व्हेंटिलेटर आता रिकामे आहेत. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होईल. ग्रामीण भागात 126 व्हेंटिलेटर दिले असून सर्व काळजी घेतली जात आहे, अशी माहितीही देशमुख यांनी दिली. मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल, संभाजीराजेही होते सहभागी यासोबत ग्रामीण भागात खाजगी रुग्णालयात कोरोना रुग्णांना येणारी अधिकची बिल कमी करण्यासाठी ऑडिटर नेमले असून जवळपास 700 पेक्षा जास्त  रुग्णांची बिलं कमी करण्यात आली आणि 50 लाखांपेक्षा जास्त रक्कम पुन्हा रुग्णांना मागे देण्यात आली आहे. मनरेगा बाबतही पुढील आठवड्यात बैठक घेऊन पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या