S M L

पुणे पालिका शाळा बस दरवाढविरोधात आंदोलन

शिवसेना देखील या आंदोलनात सहभागी झाली होती. पुण्यातील हुजूरपागा ,अहिल्यादेवी,नुमवी या शाळांचे विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते.

Sonali Deshpande | Updated On: Jun 27, 2017 01:14 PM IST

पुणे पालिका शाळा बस दरवाढविरोधात आंदोलन

हालिमा कुरेशी, 27 जून : पीएमपीएलने शालेय विद्यार्थी बस वाहतुकीत केलेल्या  दरवाढीच्या विरोधात पुणे महानगरपालिकेत विद्यार्थी  आणि पालकांनी आंदोलन केलं. शिवसेना देखील या आंदोलनात सहभागी झाली होती.  शालेय विद्यार्थ्यांनी गुलाब पुष्प देऊन अनोखं आंदोलन केलं. विद्यार्थ्यांनी पालिका सभागृहबाहेर येऊन हे आंदोलन केलं. पुण्यातील हुजूरपागा ,अहिल्यादेवी,नुमवी या शाळांचे विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते.

पुणे महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी व्यवस्थापकीय संचालकांशी  आपण बोलणार आहोत. कुठल्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ केली हे समजून घेऊ असं आश्वासन दिलं.

फी वाढ मागे घेतली नाही तर तुकाराम मुंढे यांना काम करू देणार नसल्याचा इशारा पालक व शिवसेनेनं दिलाय. उपमहापौर तुकाराम मुंडे यांनी पालिकेला विश्वासात न घेता ही दरवाढ केली आहे. मुंडे मनमानी करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. ६५ रुपये प्रती किलोमीटर वरुन १४१ रुपये प्रती किलोमीटर इतकी दरवाढ अध्यक्ष तुकाराम मुंडे यांनी केलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 27, 2017 01:14 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close