Unlock नंतर पुण्याला हादरा, ग्रीन झोनमध्येही पसरतोय व्हायरस

Unlock नंतर पुण्याला हादरा, ग्रीन झोनमध्येही पसरतोय व्हायरस

पुणे शहरात रुग्णांची संख्या वाढत असतानाच हे नवे हॉटस्पॉट तयार होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

  • Share this:

पुणे 9 जून: पुण्यात लॉकडाऊन संपल्यानंतर कोरोनाची साथ आता ग्रीनझोनमधील झोपडपट्ट्यांमधून मोठ्या झपाट्याने पसरत असल्याचं आढळून आलं आहे. खासकरून सिंहगड रोडवरील पाणमळा आणि जनता वसाहतीमध्ये तर कोरोना रूग्णांची संख्या साडेतीनशेच्यावर पोहोचलीय त्यामुळे पालिकेनं हा परिसर पत्रे ठोकून सील करून टाकला आहे. गेल्या काही दिवसांपासून मिळत असलेली सुट आणि अनलॉक नंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून संख्या वाढत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या भागातले रहिवासी कॅनॉलच्या पाईपवरून धोकादायक पद्धतीने येजा करत असल्याने अपघाताचाही धोका वाढला आहे. पुणे शहरात रुग्णांचा संख्या वाढत असतानाच हे नवे हॉटस्पॉट तयार होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

त्याचबरोबर आता बोपोडी नवा कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून पुढे येताना दिसतोय कारण गेल्या चारच दिवसात तिथं तब्बल 94 पेशंट्स आढळून आले आहेत.

पुण्यात आज दिवसभरात काय झालं?

दिवसभरात 143 पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढ.

- दिवसभरात 119 रुग्णांना डिस्चार्ज.

- पुण्यात 12 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.

- 189 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 37 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

- पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 8205.

(डॉ. नायडू हॉस्पिटल आणि खासगी हॉस्पिटल-7600 आणि ससून 605)

- पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2498.

- एकूण मृत्यू -403.

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- 5304.

- आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 1697.

या 5 जिल्ह्यात मिळून एकूण बाधित 12662 आहेत तर 595 जणांचा मृत्यू झालाय. तर 7896 डिस्चार्ज मिळाला आहे.

पुण्यात कुठे किती पेशंट्स आहेत ?

ढोलेपाटील रोड- 1643

येरवडा, कळस धानोरी- 989

भवानीपेठ- 888

कसबा, विश्रामबागवाडा- 764

शिवाजीनगर, घोलेरोड-672

बिबवेवाडी-530

वानवडी, रामटेकडी-530

सिंहगड रोड-352

हडपसर, मुंढवा-329

धनकवडी, सहकारनगर-322

नगररोड, वडगावशेरी-294

कोंढवा, येवलेवाडी-148

औंध, बाणेर, बोपोडी-119

कोथरूड, बावधन-71

वारजे, कर्वेनगर-55

देशभरात अनलॉक 1.0 अंतर्गत सोमवारपासून मॉल, हॉटेल आणि धार्मिक स्थळं खुली करण्यात आली. देशात लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली असली तरी, कोरोनाबाधितांच्या संख्येत मात्र वाढ होतच आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात 9987 नवीन रुग्ण आढळून आले तर 266 लोकांचा मृत्यू झाला आहे.

आदित्य ठाकरे यांच्या खात्याचं नाव बदललं, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

यासह भारतातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा 2 लाख 66 हजार 598 झाला आहे. मात्र असे असले तरी भारतासाठी ही चिंतेची बाब नाही आहे. याचं कारण आहे भारताचा रिकव्हरी रेट.

अरविंद केजरीवाल यांना कोरोना नाही; COVID चाचणी आली निगेटिव्ह

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात 1 लाख 29 हजार 971 सक्रीय प्रकरणं आहेत. तर, 7466 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 29 हजार 214 रुग्ण निरोगी झाले आहे. यासह भारताचा रिकव्हरी रेट 48.46% आहे. त्यामुळं भारतासाठी ही चांगली बाब आहे.

संपादन - अजय कौटिकवार

First published: June 9, 2020, 7:27 PM IST

ताज्या बातम्या