ALERT : पुण्याबरोबरच मुंबईलाही झोडपणार पाऊस; महापालिकेनं दिला इशारा

मुंबई वेधशाळेनं पुढच्या 4 तासांत मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो, असा इशारा दिला आहे. पुणे महापालिकेनं कालच्या पावसाचा धसका घेऊन आज वेळीच इशारा जारी केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 26, 2019 06:40 PM IST

ALERT : पुण्याबरोबरच मुंबईलाही झोडपणार पाऊस; महापालिकेनं दिला इशारा

मुंबई, 26 सप्टेंबर : पुण्यात बुधवारी रात्री दोन- अडीच तास तुफान कोसळलेल्या पावसाने हाहाकार उडाला. पुण्यात पूरस्थिती निर्माण झाली, त्या दलदलीतून अजूनही पुणेकर बाहेर येत असतानाच पुन्हा एकदा हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई वेधशाळेनं पुढच्या 4 तासांत मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो, असा इशारा दिला आहे. पुणे महापालिकेनं कालच्या पावसाचा धसका घेऊन आज वेळीच इशारा जारी केला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे.

Loading...

मुंबई आणि उपनगरांबरोबरच पुणे, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, जळगाव, धुळे, सोलापूर, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस होऊ शकतो असं ट्वीट पुणे जिल्हा माहिती कार्यालयाने केलं आहे.

दरम्यान पुण्यामध्ये काल झालेल्या पावसाने जिल्ह्याभरात 17 जणांचा बळी घेतला आहे. अनेक मोठ्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं होतं, ते ओसरलं असलं तरी चिखल गाळ अद्याप तसाच आहे.

पाहा : चक्क विहीरच गेली वाहून, बारामतीतला VIDEO व्हायरल

पुण्यात घाणीचं साम्राज्य माजलं आहे. सिंहगड रस्ता, कात्रज, सासवड या भागात परिस्थिती भयानक आहे. पुण्यात सिंहगड रस्त्यावर वडगावजवळील नाल्यात अनेक वाहने अडकली होतीय Jcb च्या सहाय्याने वाहने काढण्याचं काम अजून सुरू आहे. NDRF ची तीन पथके यासाठी घटनास्थळी दाखल झाली आहेत. त्यामुळे महापालिकेच्या यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा महापौरांनी दिला आहे.

पुणे: मन हेलावून टाकणारी घटना; कुत्र्याला वाचवण्यासाठी गेला आणि...

----------------------------------------------------------------------

VIDEO : पुण्याच्या पूरपरिस्थितीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 26, 2019 06:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...