मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

अमोल कोल्हेंचा एकच वार, कोरोनावर औषधाचा दावा करणारी कंपनी घायाळ!

अमोल कोल्हेंचा एकच वार, कोरोनावर औषधाचा दावा करणारी कंपनी घायाळ!

डॉ. कोल्हे यांनी Fabiflu गोळीच्या किंमतीबाबत घेतलेल्या आक्षेपाची दखल घेत ग्लेनमार्क कंपनीने या गोळीची किंमत 75 रुपये प्रती गोळी इतकी कमी केली आहे.

डॉ. कोल्हे यांनी Fabiflu गोळीच्या किंमतीबाबत घेतलेल्या आक्षेपाची दखल घेत ग्लेनमार्क कंपनीने या गोळीची किंमत 75 रुपये प्रती गोळी इतकी कमी केली आहे.

डॉ. कोल्हे यांनी Fabiflu गोळीच्या किंमतीबाबत घेतलेल्या आक्षेपाची दखल घेत ग्लेनमार्क कंपनीने या गोळीची किंमत 75 रुपये प्रती गोळी इतकी कमी केली आहे.

शिरुर, 20 जुलै : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या तक्रारीमुळे  ग्लेनमार्क कंपनीला दणका बसला आहे. अमोल कोल्हे यांच्या तक्रारीची दखल घेऊन ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने  (डीसीजीआय) 'FABIFLU'च्या खोट्या दाव्याप्रकरणी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल कंपनीला स्पष्टीकरण मागविण्यासाठी नोटीस बजावली आहे. एवढंच नाहीतर ग्लेनमार्क कंपनीने या गोळीचे दर कमी करुन 75 रुपयांवर आणण्याचा निर्णय जाहीर केला आहे. देशभरात कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढत असतानाच जून महिन्यात ग्लेनमार्क फार्मास्युटिकल कंपनीने Fabiflu नावाचे अॅन्टीव्हायरल औषध बाजारात उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. यावेळी Fabiflu ही टॅबलेट उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या रुग्णांसाठी प्रभावी असल्याचा दावा केला होता. पुणेकरांनो, काळजी घ्याच! पुण्यातील रुग्णालयांबाबत धक्कादायक चित्र समोर तसंच एका गोळीची किंमत रु. 103 यानुसार 14 दिवसांच्या उपचारासाठी रु.12,500 इतका दर निश्चित केला होता. ग्लेनमार्कच्या घोषणेनंतर खासदार डॉ. कोल्हे यांनी दि. 24 जून रोजी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि डीसीजीआयकडे रीतसर पत्र पाठवून तक्रार केली होती. 'या गोळ्यांचा खर्च हा 14 दिवसांमध्ये जवळपास 12 हजारांच्या घरात जातो, त्यामुळे हे औषध सर्वसामान्यांना परवडणारे नाही, ग्लेनमार्क फार्मा या औषध कंपनीने कोविड-19 वर फॅबीफ्लू नावाचे औषध बाजारात आणले आहे. परंतु, या औषधाची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची आहे' अशी टीका अमोल कोल्हे यांनी केली होती. त्याचबरोबर अमोल कोल्हे यांनी फॅबीफ्लू औषधावर संशय व्यक्त केला होती. ही कंपनी चुकीचे दावे करीत असून त्यांना यापासून रोखावे अशी मागणी या पत्रात केली. ही कंपनी सदर औषध कोरोनासंक्रमित मधुमेहग्रस्त रुग्णांनाही लागू पडत असल्याचा व यावर केवळ हेच एक औषध रामबाण असल्याचा दावा करीत आहे. कोरोनाबाबत IIT मुंबईच्या अहवालामुळे मुंबईसह राज्याला मोठा दिलासा डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि डीसीजीआयकडे केलेल्या तक्रारीची दखल घेत अखेर डीसीजीआयने ग्लेनमार्क फार्मास्युटिकल कंपनीकडे स्पष्टीकरण मागणारी नोटीस बजावली. दरम्यान, डॉ. कोल्हे यांनी Fabiflu गोळीच्या किंमतीबाबत घेतलेल्या आक्षेपाची दखल घेत ग्लेनमार्क कंपनीने या गोळीची किंमत 75 रुपये प्रती गोळी इतकी कमी केली असून आता 14 दिवसांच्या कोर्ससाठी रु 9150 इतका खर्च येणार आहे.
First published:

Tags: राष्ट्रवादी

पुढील बातम्या