Home /News /pune /

अखेर शाळांची घंटा वाजली; दीड वर्षानंतर सुट्टी संपली, राज्यात 6 हजार शाळा पुन्हा सुरू

अखेर शाळांची घंटा वाजली; दीड वर्षानंतर सुट्टी संपली, राज्यात 6 हजार शाळा पुन्हा सुरू

School Reopen in Maharashtra: सध्या देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटत आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी ऑफलाइन पद्धतीनं शाळा सुरू (Offline school open) करण्यात आल्या आहेत.

    पुणे, 16 जुलै: मागील जवळपास दीड वर्षांपासून जगभर कोरोना विषाणूनं थैमान (Corona pandemic) घातलं आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशातील सर्व शाळा आणि महाविद्यालयं (School and college) बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान ऑनलाइन शिक्षणाचा (Online Education) अवलंब केला, पण अनेक विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नसल्यानं त्यांच्या शिक्षणात खंड पडला आहे. सध्या देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटत आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी ऑफलाइन पद्धतीनं शाळा सुरू (Offline school open) करण्यात आल्या आहेत. पहिल्याचं दिवशी राज्यभरातील शाळांत तब्बल 4 लाखाहून अधिक विद्यार्थी हजर राहिले आहेत. राज्यात कालपासून एकूण 5 हजार 947 शाळा सुरू झाल्या आहेत. काल पहिल्याचं दिवशी एकूण 4 लाख 16 हजार 599 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. कोविड मुक्त ग्रामीण भागात 15 जुलै पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दीड वर्षांच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर राज्यात प्रथमच ऑफलाईन पद्धतीनं शाळा सुरू झाल्या आहेत. हेही वाचा-SSC Result 2021: आज एक वाजता या वेबसाईटवर बघता येईल दहावीचा निकाल राज्यात एकूण 19 हजार 997 शाळा आहेत. त्यातील 5 हजार 947 शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. सुरू करण्यात आलेल्या सर्व शाळा कोरोनामुक्त गावांत किंवा शहरात सुरू करण्यात आल्या आहेत. तर राज्यात एकूण 45 लाख 7 हजार 445 विद्यार्थ्यांपैकी 4 लाख 16 हजार 599 विद्यार्थी काल पहिल्या दिवशी हजर होते. ऑफलाईन पद्धतीनं शाळा सुरू झाली असली तरी कोरोना नियमांचं काटेकोर पालन करण्याचं करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. हेही वाचा-आजचा निकाल ऐतिहासिक! बोर्डाच्या न झालेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर त्याचबरोबर 50 टक्के क्षमतेनं विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात संसर्गाचा दर अधिक असतानाही, जिल्ह्यातील 1 हजार 54 शाळांपैकी सर्वाधिक 940 शाळा सुरू झाल्या आहेत. तर पुणे जिल्ह्यात 90 शाळा सुरू झाल्या आहेत. पण सिंधुदुर्ग, ठाणे, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत जाण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Maharashtra, Pune, School

    पुढील बातम्या