Home /News /pune /

BREAKING : मुंबईनंतर आता पुण्यातही पहिली ते 9 वीपर्यंतच्या शाळा बंद! पुन्हा वर्ग भरणार ऑनलाइन!

BREAKING : मुंबईनंतर आता पुण्यातही पहिली ते 9 वीपर्यंतच्या शाळा बंद! पुन्हा वर्ग भरणार ऑनलाइन!

मुंबईनंतर आता पुणे शहरातही (Pune corona update) कोरोना आणि ओमायक्रॉनची रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे पहिले ते 9 वीपर्यंतच्या सर्व शाळा पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय

    मुंबई, 04 जानेवारी : राज्यात कोरोना विषाणूचा नवीन प्रकार ओमिक्रॉनचा संसर्ग सुरू झाल्यापासून कोरोनाबाधित (corona) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. मुंबईनंतर आता पुणे शहरांतही (Pune corona update) मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आढळून येत आहे. त्यामुळे शहर हद्दीतील पहिली ते नववीपर्यंतच्या सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय कोविड आढावा बैठकीत घेण्यात आला आहे. यासंदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ ट्विटच्या माध्यमातून माहिती देणार आहेत. यापूर्वी मुंबई महापालिकेच्या हद्दीत 10 वी आणि 12 वीचे वर्ग वगळता इतर सर्व माध्यमाच्या शाळा प्रत्यक्ष बंद ठेऊन ऑनलाइन पद्धतीने सुरू ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहे. (Schools from 1st to 9th class closed in Mumbai) कोरोनाची लाट ओसरल्यामुळे शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. पण, मुंबईमध्ये कोरोना आणि ओमायक्रॉनची रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे मुंबईनंतर आता पुण्यातीलही सर्व शाळा पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चिंता नको, काळजी घ्या : महापौर मुरलीधर मोहोळ नव्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली, तरी त्यात बहुतांश रुग्ण हे लक्षणे विरहित आणि सौम्य लक्षणे असणारे आहेत. तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून आपली आरोग्ययंत्रणा सक्षमपणे सज्ज ठेवली असून पुणेकरांनी चिंता न करता स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्यावी. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेऊन आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. मागील आठवडाभरात सक्रीय रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यात 80 टक्क्यांपर्यंत रुग्ण हे लशीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. मात्र, प्रत्यक्ष रुग्णालयात दाखल करावे लागणाऱ्या रुग्णांची संख्या तुलनेने कमी आहे. तरीही आपण पूर्ण क्षमतेने तयारी केली आहे. राज्यातील आणखी एक मंत्री आणि खासदार कोरोना पॉझिटिव्ह महापालिकेकडे सद्यस्थितीत 4 हजार रेमिडिसिव्हीर इंजेक्शन, 1 हजार 800 खाटा, 9 हजार 500 एलपीएमची ऑक्सिजन निर्मिती क्षमता उपलब्ध आहे. ऑक्सिजन साठवण करण्याची 9 ठिकाणी सोय करण्यात आली आहे. शिवाजीनगर जम्बो हॉस्पिटलमध्येही यंत्रणा सज्ज असून कमी कालावधीत हे हॉस्पिटल सुरु करता येऊ शकते. शिवाय एकूण ऑक्सिजन बेड्सची संख्या आणि कोरोना सेंटरची संख्या आवश्यकरेनुसार वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी भरारी पथके आणखी सक्रिय केली जाणार आहेत. ही पथके नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी सज्ज असतील. त्यामुळे चिंता नको पण काळजी घ्या असे आवाहन महापौर मोहोळ यांनी केलं आहे. मुंबईतही शाळां बंद सद्यस्थितीत देशामध्ये व बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ओमायक्रॉनया कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा प्रसार वाढत असल्याने मुंबईची एकूण लोकसंख्या आणि या शहरात जगभरातून  लोकांचे येणे जाणे सुरू असल्याने या नव्या व्हेरिएंटचा प्रसार होऊ नये म्हणून कोरोनाचा (ओमायक्रॉन) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इ.10 वी व 12 वी चे वर्ग वगळता अन्य वर्ग (इ. 1 ली ते इ. 9 वी व 11 वी ) असणाऱ्या सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमाच्या शाळा दि. 04 जानेवारी 2022 ते  31.01.2022 पर्यंत प्रत्यक्ष बंद ठेवण्यात येत आहेत. Coronavirus: "...तर मुंबईत Lockdown लावणार" मनपा आयुक्तांनी स्पष्टच सांगितलं इयत्ता 1 ली ते इयत्ता 9 वी व इयत्ता 11 वी या वर्गातील विद्याथ्याने प्रत्यक्ष शाळेत उपस्थित न राहता यापूर्वी दिलेल्या निर्देशाप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने वर्ग सुरू राहणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळेतील 15 ते 18 वर्ष वयोगट असलेल्या विद्यार्थ्याचे नियोजनानुसार, लसीकरण केंद्रावर उपस्थित राहून लसीकरण सुरु राहणार आहे. याकरीता महापालिका शाळांसह अन्य खाजगी शाळांमधील लसीकरणास पात्र असणाऱ्या 15 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्याचे लसीकरण करून घेण्यासाठी शाळेत बोलवता येईल.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Corona updates, Mumbai, Pune, Pune school

    पुढील बातम्या