बारामती, 23 मे: कोरोनामुळे आईचं निधन (Mother death) झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी (Funeral) माहेरी आलेल्या विवाहित मुलीवर काळाने घाला घातला आहे. माहेरी आलेल्या मुलीचा सर्पदंश झाल्यानं दुर्दैवी मृत्यू (Daughter died after snake bite) झाला आहे. आईच्या मृत्यूनंतर काही तासांतचं सर्पदंश होऊन मुलीचाही मृत्यू झाल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. संबंधित घटना बारामतीजवळील जळोची याठिकाणी घडली आहे.
बारामतीतल जळोची गावातील रहिवासी असणाऱ्या सरूबाई बंडा ढाळे यांना काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूची बाधा झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर बारामतीतील रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान अचानक प्रकृती खालावल्यानं त्यांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे आईचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताचं. इंदापूर याठिकाणी सासरी नांदणारी मुलगी मनीषा ठोंबरे आपल्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी जळोची याठिकाणी आपल्या माहेरी आल्या. आईच्या मृत्यूमुळे संपूर्ण ढाळे कुटुंबीय शोकसागरात होते.
माहेरच्या घरी झाटलोट करत असताना मुलगी मनीषा यांना एका विषारी सापानं दंश केला. यावेळी मनीषा यांनी सापाची शेपटी पाहिली. यानंतर घरातील सर्वांनी सापाचा शोध घेतला पण साप काही सापडला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी त्वरित मनीषा यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. पण सर्वत्र कोरोनाबाधित रुग्ण असल्यानं मनीषा यांना उपचार मिळण्यास उशीर झाला. दरम्यान त्यांचा त्रासही वाढला. परिणामी मनीषा यांचा 22 मे रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला.
हे ही वाचा- OMG! काठी समजून चिमुकल्यानं हातात घेतला जिवंत साप, श्वास रोखून ठेवायला लावणारा पाहा VIDEO
आईच्या निधनामुळे दुःख सागरात लोटलेल्या ढाळे कुटुंबीयांचे अश्रूही सुखले नाहीत. तोपर्यंत नियतीनं ढाळे कुटुंबीयांवर दुसरा आघात केला आहे. आईच्या मृत्यूनंतर काही तासांतच मुलाला सर्पदंश होऊन तिचाही मृत्यू झाल्यानं ढाळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या काही तासांच्या अंतरानं मायलेकीचा मृत्यू झाल्यानं जळोची गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत मनीषा यांना दोन अपत्ये असून त्यांचा एक मुलगा दहा वर्षांचा आहे, तर त्यांची मुलगी अवघ्या तीन वर्षाची आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.