मराठी बातम्या /बातम्या /पुणे /'मिस यू डार्लिंग', मैत्रिणीचा संशयास्पद मृत्यू, मित्रानेही संपवलं आयुष्य, पुण्यात खळबळ

'मिस यू डार्लिंग', मैत्रिणीचा संशयास्पद मृत्यू, मित्रानेही संपवलं आयुष्य, पुण्यात खळबळ

मैत्रिणीच्या मृत्यूनंतर मित्राची इन्स्टापोस्ट, लगेच घेतला गळफास

मैत्रिणीच्या मृत्यूनंतर मित्राची इन्स्टापोस्ट, लगेच घेतला गळफास

मैत्रिणीचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर मित्रानेही आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.

चिंचवड, 17 मार्च : मैत्रिणीचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर मित्रानेही आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्याच्या कल्याणी नगर भागात इमारतीवरून पडून एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला होता, यानंतर आता खराळवाडी परिसरात राहणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

जयेश मंगळवेळकर असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. आत्महत्या करण्याआधी जयेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून मयत तरुणीचा फोटो शेअर केला. या फोटोसोबत त्याने भावनिक पोस्ट टाकली आणि जीवन संपवलं.

मैत्रिणीच्या मृत्यूनंतर मित्राचं टोकाचं पाऊल

जयेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'मिस यू डार्लिंग' का सोडून गेलीस तू? अशा आशयाची पोस्ट केली. ही पोस्ट केल्यानंतर काही वेळातच तरुणाने स्वत:ला गळफास लावून घेतला. या प्रकरणाचा पुढचा तपास पोलीस करत आहेत.

First published: