पुणे, 07 जून: अवघ्या एक वर्षापूर्वी लग्न (Marriage) झालेल्या विवाहितेनं आपल्या मद्यपी पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या (Married woman commits suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने माहेरच्यांकडून दारूसाठी पैसे आणावेत (demand money to buy alcohol) म्हणून आरोपी पती तिला नेहमी त्रास देत होता. आरोपी पतीच्या सततच्या छळाला कंटाळून विवाहितेनं गळफास घेऊन स्वतः ला संपवलं आहे. ही घटना 4 जून रोजी पुण्यातील लष्कर परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
स्वाती रोहित पवार असं आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचं नाव असून त्या पुण्यातील लष्कर परिसरात आपल्या पतीसोबत वास्तव्याला होता. आरोपी पती रोहित राजू पवारला दारुचं व्यसन होतं. दारुच्या आहारी गेल्यामुळे त्याच्या हाताला नोकरी किंवा रोजगारही नव्हता. त्यामुळे दारूची तहान भागवण्यासाठी राजू आपल्या पत्नीला नेहमी त्रास देत होता. पत्नीने दारुसाठी माहेरच्यांकडून पैसे आणावेत म्हणून पती मृत स्वातीचा नेहमी छळ करत होता. अनेकदा तिला शिवीगाळ आणि मारझोडही करायचा.
हे ही वाचा-तीन मुली झाल्यानं नाराज बापानं उचललं टोकाचं पाऊल; पत्नीसह मुलींना ढकललं विहिरीत
त्यामुळे मद्यपी पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून मृत स्वाती यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी निर्मला मिसाळ यांनी विवाहितेला आत्महत्येच प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी पतीसह एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत स्वातीचा अवघ्या एक वर्षापूर्वी आरोपी पती रोहितसोबत विवाह झाला होता. संसराचा गाडा सुरूही झाला नव्हता तोपर्यंत पीडित पत्नीने स्वतःला संपवलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Pune, Suicide