• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • पुणे: पत्नीसोबतचा वाद जिव्हारी लागला; तरुणाने खेड घाटात संपवलं जीवन

पुणे: पत्नीसोबतचा वाद जिव्हारी लागला; तरुणाने खेड घाटात संपवलं जीवन

Suicide in Pune: पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाने खेड घाटात भयावह पद्धतीने आपल्या आयुष्याचा शेवट (Husband commits suicide in khed ghaat) केला आहे.

  • Share this:
पुणे, 22 ऑक्टोबर: पुणे (Pune) जिल्ह्यातील खेड (Khed) तालुक्यात मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाने पत्नीसोबत झालेल्या वादानंतर (Husband wife hassle), भयावह पद्धतीने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. पुणे नाशिक महामार्गावरील खेड घाटात संबंधित तरुणाचा झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह (Husband commits suicide in khed ghaat) आढळला आहे. या घटनेची माहिती समोर येताच परिसरात खळबळ उडाली आहे. येथील काही स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर, खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. संबंधित तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. हेही वाचा-3 महिन्यांचं प्रेम अन् 20 दिवसाचा संसार, अतिशय भयावह झाला लव्ह स्टोरीचा THE END जयदीप काळूराम जैद असं आत्महत्या करणाऱ्या 40 वर्षीय व्यक्तीचं नाव असून तो खेड तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे. घटनेच्या दिवशी त्याचा आपल्या पत्नीसोबत वाद झाला होता. वाद झाल्यानंतर, जयदीप रागाच्या भरात घराबाहेर पडले होते. यानंतर खेड घाट परिसरातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला आहे. त्यामुळे पत्नीसोबत झालेला वाद जिव्हारी लागल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. खेड पोलीस या घटनेचा चहूबाजूंनी तपास करत आहेत.
Published by:News18 Desk
First published: