Home /News /pune /

Pune: सर्वांसमोर 'तो' प्रश्न विचारल्याने विद्यार्थ्यांची सटकली, शाळा सुटताच वर्गाच्या मॉनिटरला बांबू अन् बेल्टने मारहाण

Pune: सर्वांसमोर 'तो' प्रश्न विचारल्याने विद्यार्थ्यांची सटकली, शाळा सुटताच वर्गाच्या मॉनिटरला बांबू अन् बेल्टने मारहाण

Crime in Pune: पुणे शहरातील कोंढवा परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका शालेय विद्यार्थ्यांनं आपल्या काही मित्रांना हाताशी धरून वर्गातील मॉनिटरला बेदम मारहाण (Class monitor beating) केली आहे.

    पुणे, 29 मार्च: पुणे (Pune) शहरातील कोंढवा परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका शालेय विद्यार्थ्यांनं आपल्या काही मित्रांना हाताशी धरून वर्गातील मॉनिटरला बेदम मारहाण (Class monitor beating) केली आहे. अल्पवयीन आरोपीनं मॉनिटरवर वचपा काढला आहे. या प्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. या घटनेचा पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत. संबंधित मारहाणीची घटना कोंढवा परिसरातील एका शाळेत घडली आहे. याठिकाणी वर्गाच्या मॉनिटरने काही विद्यार्थ्यांना हेअर कटिंग करून का आले नाहीत? अशी विचारणा केली होती. याच कारणातून विद्यार्थ्यांनी मॉनिटरला बेल्ट आणि लाकडी बांबूने मारहाण केली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात दोन अल्पवयीन मुलांसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ओवेज कैफ (18) असं आरोपीचं नाव असून अन्य आरोपी अल्पवयीन आहेत. हेही वाचा-मुलीला छेडणाऱ्यावर बापाचा संताप; तुकडे तुकडे करून नदीत फेकले, कुटुंब हादरलं! पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलं ही कोंढव्यातील एका शाळेत आठवीच्या वर्गात शिकतात. तर 14 वर्षीय पीडित मुलगा वर्गाचा मॉनिटर आहे. घटनेच्या दिवशी 27 रोजी मॉनिटरने वर्गातील दोन विद्यार्थ्यांना सर्वांसमोर तुम्ही कटिंग करून का आले नाहीत? अशी विचारणा केली होती. याचा राग मनात धरून आरोपी मुलांनी पीडित मॉनिटरला शिवीगाळ करत दमदाटी केली.  हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही. हेही वाचा- ...अन् शाळकरी मुलानं 19 व्या मजल्यावरून मारली उडी, आईवडिलांच्या डोळ्यादेखत उचललं धडकी भरवणारं पाऊल शाळा सुटल्यानंतर आरोपी मुलांनी आपल्या अन्य काही मित्रांच्या मदतीने मॉनिटरला बेदम मारहाण केली आहे. आरोपींनी कंबरेचा बेल्ट आणि लाकडी बांबूने मारहाण केली आहे. या मारहाणीत मॉनिटर जखमी झाला आहे. मारहाणीचा हा धक्कादायक प्रकार समजल्यानंतर, पीडित मुलाच्या वडिलांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Pune

    पुढील बातम्या