पुणे 29 मे : नॅशनल डिफेंस अकॅडमी (NDA) पुणे येथे 140 व्या कोर्सच्या 300 हून अधिक कॅडेटसची पासिंग आऊट परेड (NDA PAssing Out Parade) सुरू आहे. या परेडची सलामी नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह (Admiral Karambir Singh)घेत आहेत. ते या परेडचे रिव्ह्यू ऑफिसर आणि प्रमुख पाहुणे आहेत. याच दरम्यान त्यांनी कॅडेटसना 'हाउ इज द जोश', असा सवाल केला आहे. यानंतर एकसोबतच मोठ्यानं आवाज येतो, 'हाय सर'.
पुण्यात आर्मी, एअरफोर्स आणि नौदल या तिन्ही सैन्याच्या अधिकाऱ्यांची सुरुवातीची ट्रेनिंग होते. इथे तीन वर्षांचा कोर्स पूर्ण केल्यानंतर ते आपल्या आपल्या अकॅडमीमध्ये फायनल ट्रेनिंग घेतात. याआधी शुक्रवारी करमबीर सिंह यांचा अनोखा अंदाज पुण्यात पाहायला मिळाला. ६१ वर्षाच्या सिंह यांनी NDA च्या उमेदवारांसोबत पुश-अप काढले. यानंतर त्यांनी आपल्या हंटर आणि स्कॉड्रनलाही भेट दिली. इथूनच 41 वर्षाआधी NDA चा कोर्स करुन ते नौदलात सामील झाले होते.
तिथे उपस्थित असणाऱ्या कॅडेटसना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी अचानकच त्यांना पुश-अप चॅलेंज दिलं. हे फोटो शेअर करत डिफेंस इंटेलिजेंस एजन्सीचे प्रमुख, लेफ्टिनेंट जनरल के जे एस ढिल्लन ट्विट करत म्हणाले, की एक लीडर नेहमी समोरुन लीड करतो. हे ट्विट इंटीग्रेटेड डिफेंस स्टाफच्या मुख्यालयानंही रिट्विट केलं आहे.
कोरोना महामारीदरम्यान तिसऱ्यांदा पासिंग आऊट परेडचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या संस्थेतील 300 उमेदवार उत्तीर्ण होतील आणि भारतीय सैन्य, हवाई दल आणि नौदलाचा भाग होतील. यादरम्यान या कॅडेटसचे आई-वडील किंवा नातेवाईकही तिथे उपस्थित, तेच कॅडेटसच्या खांद्यावर रँक लावतात. यानंतर अधिकृतरित्या हे सैन्याचा भाग होतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian army, Indian navy, NDA