'...म्हणून शेवटी राजकारणात येण्याचा निर्णय', अभिनेत्री प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावर सांगितलं कारण

'...म्हणून शेवटी राजकारणात येण्याचा निर्णय', अभिनेत्री प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावर सांगितलं कारण

अभिनय बेर्डेही राजकारणात येणार का? या प्रश्नालाही प्रिया बेर्डे यांनी उत्तर दिलं आहे.

  • Share this:

पुणे, 7 जुलै : 'कित्येक वर्ष सिनेसृष्टीत काम करण्याचा अनुभव आहे. त्या दरम्यान अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. त्यातून मार्ग देखील काढला. मात्र आता आपण सर्व कोरोना विषाणूचा सामना करीत आहोत. लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे सिनेसृष्टीतील कलाकार मंडळीच्या हाताला काम नाही. यामुळे अधिक प्रमाणात समस्यांना सामोरे जावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर आपण राजकारणात जाऊन, सर्व प्रश्न निश्चित सोडवू शकतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहे,' अशी प्रतिक्रिया अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी दिली आहे.

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. यावेळी प्रिया बेर्डे यांचा मुलगा अभिनय आणि स्वानंदी देखील उपस्थित होते. तर यावेळी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांनीदेखील राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि नियुक्त्या देखील करण्यात आल्या.

यावेळी प्रिया बेर्डे म्हणाल्या की, आता राजकीय जीवनाला सुरुवात केली असून येत्या काळात आजवर कलावंत मंडळींना जो त्रास भोगावा लागला आहे. त्याला न्याय देण्याचे काम पक्षाच्या माध्यमातून करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - '...तेव्हा शरद पवार योद्ध्यासारखे उभे राहिले', संजय राऊतांची तुफान फटकेबाजी

विधान परिषदेच्या 12 जागा रिक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक कलाकाराचे नावे पुढे येत असून त्यामुळे तुम्ही पक्षात प्रवेश का केला? या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, मी अगोदरच कलाकार असून मला विधान परिषदेवर जायचं आहे म्हणून मी या पक्षात प्रवेश केला नाही. माझ्या क्षेत्रातील मंडळीचे प्रश्न सोडविणे हे माझे काम असणार आहे. तसंच पक्ष जी जबाबदारी देईल, त्यानुसार येत्या काळात काम करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अभिनय देखील राजकारणात येणार का? त्या प्रश्नावर म्हणाल्या की, माझी दोन्ही मुले त्यांच्या क्षेत्रात चांगले काम करत असून ते राजकारणात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Published by: Akshay Shitole
First published: July 7, 2020, 5:14 PM IST

ताज्या बातम्या