Home /News /pune /

अभिनेत्री पायल रोहतगी विरोधात पुण्यात गुन्हा दाखल, नेहरू - गांधी परिवाराची बदनामी केल्याचा आरोप

अभिनेत्री पायल रोहतगी विरोधात पुण्यात गुन्हा दाखल, नेहरू - गांधी परिवाराची बदनामी केल्याचा आरोप

Payal Rohatgi: बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी हिच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे, 1 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी (Actress Payal Rohatgi) अडचणीत आली आहे. पुणे पोलिसांत पायल रोहतगी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस (Congress) पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांनी पायल रोहतगी विरोधात गुन्हा दाखल (Case registered against Payal Rohatgi in Pune) केला आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकरण... पुणे जिल्हा काँग्रेसच्या कमिटी सरचिटणीस असलेल्या संगीता तिवारी यांनी पायल रोहतगी विरोधात तक्रार दाखल केली आहे. पायल रोहतगी हिने एस व्हिडीओ तयार केला असून त्यात काँग्रेस पक्ष, नेहरू गांधी परिवाराबाबत खोटा आणि बदनामीकारक वक्तव्य केलं असल्याने संगीता तिवारी यांनी पायल विरोधात तक्रार दाखल केली आहे. संगीता तिवारी यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे, पायल रोहतगीने तयार केलेल्या व्हिडीओत पंडीत जवाहरलाल नेहरू आणि गांधी कुटुंबीयांबाबत चुकीचे तसेच आक्षेपार्ह विधान केले आहे. हा व्हिडीओ मी स्वत: पाहिला असून त्यानंतर तक्रार दाखल करत आहे. सौरव गांगुलीच्या आईला कोरोनाची लागण, दादाच्या कोरोना टेस्टबद्दल महत्त्वाची अपडेट या संदर्भात पुण्यातील सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. संगीता तिवारी यांनी तक्रारीत म्हटलं, पायल रोहतगी हिने अॅपचा वापर करुन एक व्हिडीओ बनवून त्यात आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी, घटनात्मक पद धारण केलेले आपल्या देशाचे माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे विषयी देखील चुकीचे, आहेपार्ह विधान करुन त्यांना बदनाम करण्याचा व त्यांचे लौकीकास बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. सदरचा व्हिडीओ सोसल मीडियात प्रसारीत करुन समाजात गैरसमज पसरवून हिंदू-मुस्लिम धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सदर महिलेच्या विरोधात माझी कायदेशीर तक्रार आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Crime, Pune

पुढील बातम्या