• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • पुण्यातील अभिनेत्रीसह तिच्या मित्राचा गोव्यात मृत्यू; गाडीवरील नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात

पुण्यातील अभिनेत्रीसह तिच्या मित्राचा गोव्यात मृत्यू; गाडीवरील नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात

अपघातग्रस्त कार... (फोटो-पुणेकर न्युज)

अपघातग्रस्त कार... (फोटो-पुणेकर न्युज)

सोमवारी पहाटे गोव्यातील बागा-कलंगुट येथील एका पुलावरून चारचाकी गाडी खाडीत कोसळल्याने (Car accident in goa) पुण्यातील अभिनेत्रीसह तिच्या मित्राचा मृत्यू (Actress from pune and her friend death) झाला आहे. ईश्वरी देशपांडे (Ishwari Deshpande) आणि शुभम देडगे (Shubham Dedge) असं अपघातात मृत पावलेल्या दोघांची नावं आहेत.

 • Share this:
  पुणे, 21 सप्टेंबर: सोमवारी पहाटे गोव्यातील बागा-कलंगुट येथील एका पुलावरून चारचाकी गाडी खाडीत कोसळल्याने (Car accident in goa) पुण्यातील अभिनेत्रीसह तिच्या मित्राचा मृत्यू (Actress from pune and her friend death) झाला आहे. अपघात होऊन गाडी खाडीत कोसळल्यानंतर गाडी सेंट्रल लॉक झाल्याने संबंधित अभिनेत्रीचा आणि तिच्या मित्राचा नाकातोंडात पाणी शिरून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संबंधित अभिनेत्रीने अलीकडेच एका हिंदी आणि मराठी चित्रपटाचं चित्रीकरण केलं होतं. अशात हा अपघात घडल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. ईश्वरी देशपांडे (Ishwari Deshpande) आणि शुभम देडगे (Shubham Dedge) असं अपघातात मृत पावलेल्या दोघांची नावं आहेत. मृत शुभम आणि ईश्वरी बुधवारी पुण्यातून गोव्याला फिरायला गेले होते. दरम्यान सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास बागा येथील अरुंद रस्त्यावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी सरळ खाडीत जाऊन कोसळली (car crashed into deep creek) आहे. अपघात झाल्यानंतर ईश्वरी आणि शुभम सेंट्रल लॉकमुळे दोघंही गाडीतच अडकले. त्यानंतर नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हेही वाचा-भयंकर! पहिल्या मजल्यावरून आईला दिला धक्का, डोकं फुटून झाला मृत्यू अभिनेत्री ईश्वरी देशपांडे आणि मित्र शुभम देडगे मागील बऱ्याच वर्षांपासून दोघं एकमेकांना ओळखत होते. त्यांच्या या ओळखीच रुपांतर प्रेमात झालं होतं. पुढच्या महिन्यात दोघंही साखरपुडा करणार होते. दरम्यान हा अपघात झाल्याने त्यांचा संसार सुरू होण्यापूर्वीच मोडला आहे. मृत ईश्वरी ही पाषाण-सूस परिसरात वास्तव्याला होती. तर शुभम हा नांदेड सिटी परिसरातील रहिवासी होता. हेही वाचा-डोंगरावर फिरायला गेलेल्या दीराने केली भलतीच मागणी; नकार देताच वहिनीचा भयंकर शेवट विशेष म्हणजे, ईश्वरीने काही दिवसांपूर्वी तिची भूमिका असलेल्या मराठी आणि एका हिंदी चित्रपटाच चित्रीकरण पूर्ण केलं होतं. पण या चित्रपटाची प्रदर्शनपूर्वीची काही कामं अद्याप बाकी होती. ईश्वरीला लहानपणापासून अभिनय क्षेत्रात करिअर करण्याची आवड होती. त्यामुळे ती या क्षेत्राकडे वळली होती. पण नियतीने तिची सर्व स्वप्न हिरावून घेतली आहे. या घटनेनं पुणे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
  Published by:News18 Desk
  First published: