Home /News /pune /

धक्कादायक: रंगाऐवजी पुण्यात आठ वर्षांच्या चिमुरड्यावर फेकलं अ‍ॅसिड!

धक्कादायक: रंगाऐवजी पुण्यात आठ वर्षांच्या चिमुरड्यावर फेकलं अ‍ॅसिड!

पुण्यात धुळवडीच्या उत्सवाला गालबोट लागलं आहे. रंग खेळताना आठ वर्षांच्या चिमुरड्यावर चक्क अ‍ॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पिंपरी-चिंचवड,11 मार्च: पुण्यात धुळवडीच्या उत्सवाला गालबोट लागलं आहे. रंग खेळताना आठ वर्षांच्या चिमुरड्यावर चक्क अ‍ॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगवी परिसरात ही घटना घडली असून चिमुरडा गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. या प्रकरणी अकरा वर्षांच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, धुळवडीच्या रंगाऐवजी चक्क अ‍ॅसिड फेकल्याने एक चिमुरडी गंभीररित्या भाजला गेला. रंगाचा उत्सवात आयुष्य बेरंग करणारी आणि अशी जीवावर बेतणारी घटना समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. धुळवडीच्या दिवशी एकीकडे सगळं जग रंगात भिजत असताना हा चिमुकला मात्र त्यांच्या अंगावर पडलेल्या अ‍ॅसिडमध्ये भाजून निघाला होता. घटना लक्षात येताच या चिमुकल्याच्या पालकांनी त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केल आणि वेळीच उपचार मिळाल्याने पुढचा अनर्थ टळला, असं औंध रुग्णालयाचे डॉ. गणेश यांनी सांगितलं आहे. हेही वाचा..लक्षवेधी होळी, पीडित शेतकऱ्यांनी 'या' नेत्याचे फोटो होळीला लावून ठोकली बोंब सांगवी परिसरात मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. दोन मुले मंगळवारी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास धुळवडी निमित्त रंग खेळत होते. एकमेकांच्या अंगावर रंग उडवत होते. त्याचवेळी आठ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या अंगावर दुसऱ्या मुलाने रंग समजून पांढऱ्या रंगाच्या बाटलीतील अ‍ॅसिड फेकलं. यात तो गंभीर भाजला. आई-वडिलांना हे कळताच त्यांनी मुलाला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. मुले रंग खेळत असलेल्या ठिकाणी घरातील फरशी पुसण्याचं रंगीत ॲसिड आणून ठेवले होते. खेळता खेळता मुलांपैकी एकाने अ‍ॅसिड असलेली बाटली उचलली आणि दुसऱ्या मुलाच्या अंगावर भिरकावली. त्यामुळे मुलाच्या अंगावर ॲसिड उडाले. यात तो गंभीर जखमी झाला. या प्रकरणी जखमी मुलाच्या वडिलांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. हेही वाचा..दिवसभर दगड गोळा करायची आणि संध्याकाळी एकमेकांवर तुफान दगडफेक, पाहा हा अजब परंपरेचा VIDEO रंगाऐवजी अ‍ॅसिड फेकण्याचं हे भायनक कृत्य असून पीडित मुलाच्या शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणी पोलिसांत रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगवी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुळीग यांनी सांगितलं आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर ही घटना नेमकी का घडली हे समोर येईल. मात्र रंग उधळून रंगोत्सवाचा आनंद साजरा करण्या ऐवजी चेहऱ्यांना केमिकल युक्त रंग लावून किंवा एकमेकांच्या अंगावर अंडे फोडून आनंद व्यक्त करण्याचे ओंगळवाणे प्रकार अलीकडे रूढ होऊ लागले आहेत. आणि त्यातूनच हा प्रकार घडला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Acid attact, Holi festival, Maharashtra news, Pimpari chinchvad, Pune crime

पुढील बातम्या