पाच वर्षांपासून मुंबई पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी पुणे पोलिसांच्या जाळ्यात

पाच वर्षांपासून मुंबई पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी पुणे पोलिसांच्या जाळ्यात

अठरा वर्षांपूर्वी मुंबई मुलुंड येथे कौटुंबिक वादातून नातेवाईकांचा खून केल्याप्रकरणी नाशिक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने मुलीच्या लग्न करता पाच वर्षांपूर्वी न्यायालयातून बंदी रजा मिळवली.

  • Share this:

लोणावळा, 8 फेब्रुवारी: अठरा वर्षांपूर्वी मुंबई मुलुंड येथे कौटुंबिक वादातून नातेवाईकांचा खून केल्याप्रकरणी नाशिक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने मुलीच्या लग्न करता पाच वर्षांपूर्वी न्यायालयातून बंदी रजा मिळवली. परंतु बंदी रजा संपल्यानंतर तो पुन्हा कारागृहात परत ता मुंबईत पोलिसांना गुंगारा देत आरोपी निसटला पुणे, पिंपरी चिंचवड, मावळ अशा अनेक ठिकाणी सिक्युरिटीच्या नोकरीच्या माध्यमातून आपलं ठिकाण बदलत राहणाऱ्या आरोपीच्या मुसक्‍या अखेर गुन्हे शाखा ५ च्या पथकाने आवळ्ल्या आहेत.

मल्हारी जाधव असे तब्बल पाच वर्ष मुंबई पोलिसांना चकवा देणाऱ्य आरोपीचे नाव आहे.

मुंबई पोलिसांनी मागील पाच वर्षापासून फरार आरोपी मल्हारी याचा अनेक ठिकाणी शोध घेतला परंतु पोलिसांच्या हाती निराशाच आली पिंपरी येथील आयप्पा मंदिरा जवळ वास्तव्यास असलेला आरोपी मल्हारी हा काही कामानिमित्त देहूरोड येथील सेंट्रल चौकात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे तसेच त्यांच्या पथकाला गुप्त बातमीदार मार्फत मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी मल्हारी यास ताब्यात घेतले सखोल विचारपूस केल्यानंतर 2015 सालापासून न्यायालयातून मिळवलेली बंदी रजा संपल्यानंतरही कारागृहात न जाता फरार असल्याची माहिती आरोपीने पोलिसांना दिली त्यानुसार त्याला ताब्यात घेत कारवाई करून मुंबई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले मुंबई पोलिसांसोबत तब्बल पाच वर्ष चाललेल्या या लपंडावाचा अखेर गुन्हे शाखा 5 च्या पोलिसांनी अखेर शेवट केला तसेच आरोपीची रवांनगी पुन्हा तुरुंगात केली आहे.

First Published: Feb 8, 2020 06:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading