पुण्यातून एटीएममध्ये भरायचे 4 कोटी घेऊन 'तो' पळाला, कर्नाटकात पकडला

एटीएममध्ये रोख रकमेचा भरणा करणाऱ्या वाहनचालकाने चार कोटी रुपयांची रोख रक्कम आणि व्हॅन घेऊन धूम ठोकली होती.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 30, 2017 07:11 PM IST

पुण्यातून एटीएममध्ये भरायचे 4 कोटी घेऊन 'तो' पळाला, कर्नाटकात पकडला

30 सप्टेंबर : एटीएममध्ये रोख रकमेचा भरणा करणाऱ्या वाहनचालकाने चार कोटी रुपयांची रोख रक्कम आणि व्हॅन घेऊन धूम ठोकली होती.  मात्र, अवघ्या काही तासांतच या भामट्याला कर्नाटकमधून पोलिसांनी जेरबंद केलंय. नारायण  नारायण कोडकर असं या सुरक्षारक्षकाचं नाव आहे.

नेहमीप्रमाणे एक्सीस या बँकेची एटीएममध्ये रोख रकमेचा भरणा करणारी बलेरो व्हॅन ससानेनगर येथील एटीएम समोर आली. रोख रकमेचा भरणा करण्यासाठी काही रक्कम घेऊन व्हॅनमधील कर्मचारी एटीएमच्या दिशेने गेले. एटीएममध्ये कॅश भरून ते पुन्हा रस्त्यावर येऊन पाहिले असता त्यांची व्हॅन आणि व्हॅनमधील अंदाजे चार कोटी रुपयांची रोख रक्कम घेऊन वाहनचालक  नारायण कोडकर पसार झाला होता. गाडीत लावण्यात आलेली जीपीएस यंत्रणा त्या आरोपी वाहनचालकाने बंद करून ठेवलेली होती.

यामुळे त्याने बँकेची रक्कम घेऊन पोबारा केल्याची खात्री झाल्यावर बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली.मात्र रात्री उशिरापर्यंत आरोपी वाहनचालक याचा तपास लागू शकला नाही.

सिक्युरिटी व्हॅल्यू नावाच्या व्हॅनमधून 4 कोटी रुपये घेऊन हा सुरक्षा रक्षक पुणे ते बँगलोर या हायवेवरुन जात होता. हावेरी जिल्ह्यातल्या बंकापूर गावाजवळ पी एस आय संतोष पाटील यांनी कारवाई केली. बंकापूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2017 07:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...