अनिस शेख, प्रतिनिधीपुणे, 27 मे: मुंबई-पुणे एक्सप्रेसवे (Mumbai Pune Expressway)वर मर्सिडीज कारचा भीषण अपघात (Mercedes car accident) झाला आहे. भरधाव मर्सिडीज कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट रस्त्याच्या शेजारील सुरक्षा कठड्याला धडकली. हा अपघात इतका भीषण आहे की, गाडीचा चालक गेल्या तासभर चालक गाडीतच अडकला होता.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर किवळे एक्झिट जवळ हा अपघात झाला आहे. कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या शेजारील सुरक्षा कठड्याला धडकली. या अपघातात कार चालक गंभीर जखमी झाला आहे. कार चालक गाडीतच अडकून होता.
VIDEO: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर 'द बर्निंग कार'चा थरार, धावत्या कारने घेतला पेट
अपघाताची माहिती मिळताच देवदूत यंत्रणा आणि आयआरबी, स्थानिक पोलीस अधिकारी घटनास्थाळी दाखल झाले. या सर्वांनी मिळून कारमध्ये अडकलेल्या तरुणाला कारमधून बाहेर काढण्यात आले असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातात जखमी झालेला हा तरुण जवळपास तासभर गाडीतच अकडून होता तासाभरानंतर या तरुणाला कारमधून बाहेर काढण्यात आले असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.