Home /News /pune /

पुण्यातील नवले पुलाजवळ विचित्र अपघात, 15 गाड्या एकमेकांवर आदळल्या!

पुण्यातील नवले पुलाजवळ विचित्र अपघात, 15 गाड्या एकमेकांवर आदळल्या!

या विचित्र अपघातात एकापाठोपाठ 15 गाड्यांनी एकमेकांना धडक दिली आहे. या अपघातामुळे एकच गोंधळ उडाला आहे.

पुणे, 06 ऑक्टोबर : पुणे शहरातील नवले पूलाजवळ विचित्र अपघात झाला आहे. जवळपास 10 ते 15 गाड्या एकमेकांवर आदळल्या आहे. या अपघातात एका जणाचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले असून जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुण्यात कात्रज बायपास रोडवर  नवले पुलाजवळ आज सकाळी हा अपघात घडला आहे. या विचित्र अपघातात ट्रकने 10 ते 15 गाड्यांना धडक दिली. भरधाव ट्रकने समोर येईल त्या वाहनांना जोराची धडक दिली आहे. या धडकेमुळे काही वाहनं ही रस्त्याच्या बाजूला फेकली गेली होती. मिळालेल्या माहितीनुसार, हा ट्रक कात्रजकडून देहूरोडच्या दिशेने चाललेला होता. अचानक टायर फुटल्यामुळे ट्रकचालकाचा ट्रकवरचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात घडला आहे. या भरधाव ट्रकने समोर येईल त्या वाहनांना धडक देत पुढे गेला. यात  दुचाकी आणि चार चाकी गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले.  या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू झाला. तर आणखी चार जणांना नवले रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वाहतूक पोलिसांनी धाव घेतली. जखमी व्यक्तींनी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातामुळे नवले पुलाजवळ वाहतूक कोंडी झाली होती.  पोलिसांनी तात्काळ क्रेन लावून ही वाहणं बाजूला हटवल्याने तिथली वाहतूक आता सुरळीत झाली आहे. ट्रकची पिकअप व्हॅनला धडक, 6 मजुरांचा मृत्यू दरम्यान, मध्य प्रदेशमधील धार जवळ झालेल्या एका भीषण अपघातात 6 शेतमजुरांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी 20 मजूर जखमी झाले आहे. यातील 8 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झाल्या 20 हजार रिकाम्या खुर्च्या, वाचा PHOTO मागचं रहस्य धार जवळील इंदुर-अहमदाबाद महामार्गावर ही घटना घडली आहे. सोयाबीनची कापणी करून हे शेतमजूर पिकअप व्हॅनने केसूर इथून टांडा इथं जात होते. वाटेत पिकअप व्हॅन पंक्चर झाली. त्यामुळे रस्त्याच्या कडेला व्हॅनचे टायर बदली करण्यात येत होते. यावेळी काही शेतमजूर ड्रायव्हरला मदत करण्यासाठी खाली उतरले होते. तर काही जण हे गाडीतच बसलेल होते. दारू माफियांची गुंडगिरी, कार्यालयात घुसून अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला त्याचवेळी अचानक भरधाव वेगात आलेल्या टँकरने पिकअप व्हॅनला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, रस्ताच्या बाजूला उभे असलेल्या शेतमजुरांसह ट्रॅकने व्हॅनला जोरात धडक दिली. यात चार शेतमजूर हे चाकाखाली सापडले आणि त्यांचा जागेवर मृत्यू झाला. तर गाडी बसलेल्या दोन मंजुरांचाही जागीच मृत्यू झाला. या 20 अपघातात मजूर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या