पुण्यात खासगी बस-कारचा भीषण अपघात, संचेती हॉस्पिटलमधील डॉक्टरसह दोघांचा जागीच मृत्यू

पुण्यात खासगी बस-कारचा भीषण अपघात, संचेती हॉस्पिटलमधील डॉक्टरसह दोघांचा जागीच मृत्यू

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मध्यरात्री भीषण अपघात झाला आहे. लक्झरी बसनं स्विफ्ट कारला मागून जोरदार धडक दिल्यानं दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे

  • Share this:

पुणे (तळेगाव), 16 सप्टेंबर : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर रविवारी (15 सप्टेंबर) रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला.  लक्झरी बसनं स्विफ्ट कारला मागून जोरदार धडक दिल्यानं दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. गंहुजे गावाजवळील ही घटना आहे. रस्त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या कारला बसनं मागील बाजूनं जोरदार धडक दिली. कारमधील प्रवास पंक्चर झालेलं टायर बदलत असताना ही दुर्घटना घडली. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पुण्यातील संचेती हॉस्पिटलचे डॉक्टर केतन खुर्जेकर आणि त्यांच्या चालकाचा समावेश आहे.

चेतन खुर्जेकर हे संचेती हॉस्पिटलमधील मणक्यांशी संबंधित आजारांचे मुख्य डॉक्टर होते. खुर्जेकर मुंबईहून पुण्याकडे परतत असताना त्यांच्या कारचा टायर पंक्चर झाला. टायर बदलण्यासाठी ते आपल्या चालकाला मदत करत होते, त्याचवेळेस खासगी बसनं दोघांनाही उडवलं. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

अपघातात कारचा झाला चेंदामेंदा

अपघातात कारचा झाला चेंदामेंदा

डॉ. केतन खुर्जेकर

डॉ. केतन खुर्जेकर

VIDEO: तरुणाचं मानसिक संतुलन बिघडलं, PUBGमुळे बडबडतो 'पुढं हेडशॉट मारतो मी'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 16, 2019 07:45 AM IST

ताज्या बातम्या